Jio 5G | High speed 5Gसाठी जिओचा मोठा डाव...Airtelला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio 5G

Jio 5G : High speed 5Gसाठी जिओचा मोठा डाव...Airtelला धक्का

मुंबई : हायस्पीड 5G नेटवर्कसाठी रिलायन्स जिओने नोकिया आणि एरिक्सन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. हा अनेक वर्षांचा करार आहे. या डील अंतर्गत नोकिया आणि एरिक्सन कंपनीसह Jio ग्राहकांना हाय-स्पीड 5G नेटवर्क प्रदान करतील.

नोकिया आणि एरिक्सनच्या नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी सपोर्टद्वारे जिओ आपल्या ग्राहकांना अल्ट्रा हाय इंटरनेट स्पीड देईल असा दावा केला जात आहे. तसेच लॅग-फ्री कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल.

हेही वाचा: जिओच्या ३ रिचार्ज प्लॅनच्या किंमतींत वाढ; असे आहेत तपशील

जिओ वापरकर्त्यांची धमाल

स्वीडिश दूरसंचार गीअर निर्माता एरिक्सनने रिलायन्स जिओसोबत धोरणात्मक 5G कराराची घोषणा केली आहे. ही कंपनी Jio साठी स्टँडअलोन मेगा 5G नेटवर्क प्रदान करण्यासाठी काम करेल. Jio ही एकमेव कंपनी आहे जी भारतात स्टँडअलोन 5G नेटवर्क प्रदान करते. नोकियाच्या वतीने, जिओला 5G रेडिओ फ्रिक्वेन्सी ऍक्सेस नेटवर्क (RAN) मध्ये मदत केली जाईल.

एअरटेलला का बसला झटका ?

जिओने नोकिया आणि एरिक्सनसोबत केलेल्या भागीदारीमुळे एअरटेलला मोठा झटका बसला आहे. खरं तर, नोकिया आणि एरिक्सन भारतात जिओचे स्टँडअलोन नेटवर्क स्थापित करण्यात मदत करतील.

तसेच हाय स्पीड 5G नेटवर्क ऑफर करेल. तर एअरटेल नॉन स्टँडअलोन नेटवर्कवर काम करते. तसेच, Jio कडे अधिक कव्हरेज क्षेत्रासह 700MHz नेटवर्क उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, हाय-स्पीड 5G नेटवर्क अधिक कव्हरेजमध्ये Jio द्वारे प्रदान केले जाऊ शकते.

हेही वाचा: Jio recharge : ३ महिन्यांच्या प्लॅनमध्ये १५० रुपयांची सूट

हायस्पीड 5G इंटरनेट मिळेल

असा अंदाज आहे की 5G डेटा स्पीड भारतात 4G पेक्षा 10 पट जास्त असेल. या हाय-स्पीड 5G नेटवर्कच्या मदतीने सेल्फ-ड्रायव्हिंग कार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या तंत्रज्ञानाचे विलीनीकरण होण्यास मदत होईल.

रिलायन्स जिओने 5G स्पेक्ट्रम लिलावात सर्वाधिक किंमतीत स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. तसेच, कंपनी गुगलच्या सहकार्याने लवकरच 5G फोन लॉन्च करणार आहे. सध्या जिओने 4 शहरांमध्ये 5G नेटवर्क आणले आहे.