Recharge Plans: मस्तच! अवघ्या १९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ९० दिवस सुरू राहील सिम कार्ड, पाहा डिटेल्स

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे अवघ्या १९ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
Recharge Plans
Recharge PlansSakal

Best Prepaid Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे प्रीपेड प्लॅन्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. मात्र, या रिचार्ज प्लॅन्सची किंमत जास्त आहे. या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन्स सादर करत असते. कंपनीकडे असाच १९ रुपयांचा शानदार प्लॅन उपलब्ध आहे.

BSNL च्या १९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल ९० दिवसांची वैधता मिळते. १९ रुपयांच्या या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Recharge Plans
Noise Smartwatch: भारतीय कंपनीची १५०० रुपयांच्या बजेटमधील शानदार वॉच लाँच; फीचर्स अफलातून

BSNL चा १९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

BSNL कडे १९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये एकूण ५० एमबी डेटा दिला जातो. या रिचार्जचे वैशिष्ट्ये म्हणजे याची वैधता तब्बल ९० दिवस आहे. तसेच, कॉलिंगसाठी २० मिनिटं दिली जातात. हा एक एक्सटेंशन प्लॅन आहे.

Airtel चा १९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

टेलिकॉम कंपनी Airtel कडे देखील अवघ्या १९ रुपयांचा शानदार प्लॅन उपलब्ध आहे. १ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये एकूण १ जीबी डेटा दिला जातो.

हेही वाचा: Electric Car: मस्कच्या Tesla चे धाबे दणाणार, Sony-Honda ने सादर केली भन्नाट फीचर्ससह येणारी कार

Vodafone Idea चा १९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea च्या १९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २४ तास म्हणजे संपूर्ण १ दिवस आहे. यामध्ये तुम्हाला १ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, चित्रपट आणि सीरिज देखील मोफत पाहता येईल.

Jio चा २६ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओकडे २६ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. मात्र, लक्षात घ्या की हा प्लॅन केवळ JioPhone यूजर्ससाठी आहे.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com