जिओचं नव्या वर्षात मोठं गिफ्ट; सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग

टीम ई सकाळ
Thursday, 31 December 2020

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने नव्या वर्षात ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे. कंपनीने सर्व नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग फ्री करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने नव्या वर्षात ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे. कंपनीने सर्व नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग फ्री करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने हे पाऊल टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आदेशानंतर उचललं आहे. ग्राहकांना या सुविधेचा फायदा 1 जानेवारी 2021 पासून मिळणार आहे. यामुळे आता जिओचे ग्राहक एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलच्या सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकणार आहेत. 

जिओ टू जिओ नेटवर्कवर आधी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळत होती. मात्र ट्रायने जानेवारी 2021 पर्यंत IUC (इंटरकनेक्ट युजेस चार्ज) संपुष्टात आणणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे जिओ युजर्सना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्रत्येक मिनिटाला 6 पैसे मोजावे लागत होते. रिलायन्स जिओच्या युजर्सना आता कोणत्याही नेटवर्कच्या नंबरवर फ्री कॉलिंग करता येणार आहे.

हे वाचा - खुशखबर! 20 हजार रुपयांनी स्वस्त झाला आयफोन

फ्री व्हॉइस कॉलिंगसाठी कंपनीचे काही स्वस्तातले प्लॅनही आहेत. यामध्ये 129 रुपयांचा प्लॅन असून युजर्सला 2 जीबी डेटाही मिळतो. या प्लॅनची मुदत 28 दिवसांची आहे. आता युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. याशिवाय जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. या प्लॅनची मुदत 24 दिवसांसाठी आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. 

हे वाचा - घरबसल्या पोर्ट करा Jio, Airtel आणि VI मध्ये आपला नंबर; जाणून घ्या प्रोसेस?

जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये दीड जीबी इंटरनेट डेटा मिळेल. या प्लॅनची मुदत 28 दिवसांसाठी असून युजर्सना एकूण 42 जीबी डेटा मिळतो. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. जिओच्या आणखी एका प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे. 555 रुपयांचा हा प्लॅन असून याची मुदत 84 दिवसांची आहे. दररोज दीड जीबी इंटरनेट डेटाही मिळतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jio anounce free calling on all other network from 1 January