

JioBharat 4G Phone Offer: Get 6 Months Free Recharge & 14GB Data
esakal
JioBharat 4G Phone Offer: रिलायन्स जिओने आपल्या 10 व्या वर्धापन दिनाचे (10th Anniversary Offer) औचित्य साधून ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर जाहीर केली आहे. देशातील सुमारे 20 कोटी 2G युझर्सना डिजिटल नेटवर्कशी जोडण्याच्या उद्देशाने जिओने 'जिओभारत 4G' (JioBharat 4G) फोनवर मोफत रिचार्ज आणि डेटाची धमाकेदार ऑफर आणली आहे. या योजनेमुळे आता फक्त 299 रुपयांच्या प्रभावी किंमतीत युझर्सना नवीन 4G फोन खरेदी करता येणार आहे.