९० दिवसांच्या वैधतेसह येतो Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन, भरपूर डेटा-हाय स्पीड इंटरनेटचा मिळेल फायदा | Mobile Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jio

Mobile Plans: ९० दिवसांच्या वैधतेसह येतो Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन, भरपूर डेटा-हाय स्पीड इंटरनेटचा मिळेल फायदा

Jio Cheapest mobile recharge: Plans: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडे ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत. प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी कंपनी सातत्याने नवनवीन प्लॅन्स लाँच करत आहे. तुम्ही जर ३ महिन्यांच्या वैधतेसह येणारा प्लॅन शोधत असाल तर जिओकडे शानदार रिचार्ज उपलब्ध आहे. बहुतांश प्लॅनमध्ये ८० ते ८४ दिवसांची वैधता मिळते. मात्र, या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ९० दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Reliance Jio चा ७४९ रुपयांचा प्लॅन

टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे ७४९ रुपयांचा शानदार प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि डेली डेटाचा फायदा मिळतो. प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. अशाप्रकारे एकूण १०८ जीबी डेटा दिला जातो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

कंपनीकडे ३ महिने, वर्षभराच्या वैधतेसह येणारे इतर प्लॅन देखील उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला ओटीटी बेनिफिट्स, जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

हेही वाचा: Hero Bike: हीरोने भारतात लाँच केली भन्नाट बाईक, पॉवरफुल इंजिनसह मिळेल बरचं काही; पाहा किंमत

दरम्यान, कंपनी ५जी वेलकम ऑफर अंतर्गत अनलिमिटेड ५जी डेटा देखील देत आहे. तुमच्याकडे ५जी फोन असल्यास तुम्ही सुपरफास्ट इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. कंपनीकडे ७१९ रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी १६८ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते.

हेही वाचा: iPhone 14: आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय लेटेस्ट आयफोन, पहिल्यांदाच बंपर डिस्काउंटसह खरेदीची संधी

टॅग्स :rechargemega recharge