Best Jio Plan: जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! मिळतो 2.5GB डेली डेटा, अमर्यादित कॉल्स अन् बरंच | Jio cheapest prepaid recharge plan price 2.5gb daily data unlimited- voice call sms | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jio launches 349 and 899 rupees prepaid recharge plans with unlimited call 2.5 gb daily data

Best Jio Plan: जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! मिळतो 2.5GB डेली डेटा, अमर्यादित कॉल्स अन् बरंच

Best Jio Recharge Plan: नुकतेच रिलायन्स जिओ कंपनीने ग्राहकांसाठी व्हॅलेंटाईन डे ऑफर जाहीर केली होती. या ऑफर अंतर्गत जिओ वापरकर्त्यांना अतिरिक्त मोफत डेटा, फ्लाइट तिकीट बुकिंगवर सूट, मॅकडोनाल्ड, फर्न्स आणि पेटल्स यासारख्या अनेक ऑफर दिल्या जात आहेत.

रिलायन्स जिओचे असे अनेक प्रीपेड प्लॅन आहेत ज्यात दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. Jio चे हे प्रीपेड पॅक 349, 899 आणि 2023 रुपयांचे आहेत. ज्यात अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. चला या जिओच्या या प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

रिलायन्स जिओचा 2023 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 2023 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 252 दिवसांची असून या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 630 GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल कायम आहेत. म्हणजेच, जिओ ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते. 5G सेवा नाुपणापे ग्राहक या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा वापरू शकतात.

899 रुपयांचा रिलायन्स जिओ प्लॅन

रिलायन्स जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या रिचार्जमध्ये ग्राहक एकूण 225GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

Jio च्या या रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एसएमएस मोफत दिले जातात. Jio वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. 5G नेटवर्क चालवणारे ग्राहक अमर्यादित 5G डेटा वापरू शकतात.

रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 30 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटाची सुविधा दिली जाते. या रिचार्ज पॅकमध्ये एकूण 75GB डेटा उपलब्ध आहे. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सची ऑफर दिली जाते. म्हणजेच, ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. Jio ची 5G सेवा वापरणारे ग्राहक या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा चालवू शकतात.

जिओ व्हॅलेंटाइन ऑफरचे फायदे

जिओ व्हॅलेंटाइन ऑफर अंतर्गत, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 12GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. याव्यतिरिक्त, 199 रुपयांच्या खरेदीवर, तुम्हाला McDonalds कडून र 105 रुपये किमतीचे McAloo Tikki/चिकन कबाब मोफत मिळू शकतात.

Ferns & Petals कडून 799 रुपयांच्या ऑर्डरवर फ्लॅट 150 रुपयांटी सूट देखील मिळेल.

याशिवाय 4500 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या फ्लाइटच्या बुकिंगवर Ixigo कडून 750 रुपयांची सूट मिळेल.

टॅग्स :Jio