
जिओने एक लोकप्रिय रीचार्ज प्लॅन बंद केला आहे
तसेच काही रीचार्जचे दर वाढवलेही आहेत
गेल्या वर्षीही एयरटेल, जिओ आणि Vi सारख्या कंपन्यांनी रीचार्ज दर वाढवले होते
Jio Discontinues Popular 1GB Per Day Plan : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने आपल्या ग्राहकांना धक्का देताना लोकप्रिय 1GB प्रतिदिन डेटा प्लॅन बंद केला आहे. यामुळे ग्राहकांना आता अधिक खर्च करावा लागणार असून कंपनीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियासह सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या. यंदा किमतीत वाढ नसली तरी जिओने आपल्या प्लॅन्समध्ये बदल केले आहेत.