

jio with google
esakal
Jio India: रिलायन्स जिओने ग्राहकांना मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने Google सोबत AI तंत्रज्ञानासंदर्भात मोठी भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत सर्व पात्र जिओ वापरकर्त्यांना पुढच्या १८ महिन्यांसाठी Google AI Pro चे प्रीमियम सब्सक्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. यापूर्वी एअरटेल कंपनीने वापरकर्त्यांसाठी Perplexity Pro सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी मोफत देण्याची घोषणा केली होती. आता जिओनेही आपल्या ग्राहकांना मोफत एआय सब्सक्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.