
Jio चे महिनाभर चालणारे प्लॅन; मिळेल 50 GB पर्यंत डेटा अन् बरंच..
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये एक महिन्याची वैधता असलेले रिचार्ज प्लॅन दिला आहे. कंपनीचा हा प्लॅन 259 रुपयांचा आहे. या प्लॅन व्यतिरिक्त, कंपनीकडे 30 दिवस चालणारे आणखी चार उत्तम प्लॅन देखील आहेत. या प्लॅनमध्ये कंपनी 50 GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगसह अनेक फायदे देत आहे.
Jio चा 259 रुपयांचा प्लॅन
Jio चा हा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो, प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 GB डेटा देते. दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.
Jio चा 296 रुपयांचा प्लॅन
कंपनी Jio च्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देत आहे. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी कोणत्याही दैनिक मर्यादेशिवाय 25 जीबी डेटा देत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.
हेही वाचा: Maruti लवकरच लॉन्च करणार 'ही' नवीन कार; जाणून घ्या काय असेल खास
30 दिवसांचे इतर प्लॅन
कंपनी 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये 241 रुपये आणि 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देत आहे. हे सर्व डेटा व्हाउचर आहेत. 181 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये तुम्हाला 30 जीबी डेटा मिळेल. त्याच वेळी, कंपनी 241 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी 40 जीबी डेटा देत आहे. तर 301 रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 50 जीबी डेटा दिला जात आहे.
हेही वाचा: शिवसेनेचं मुंबईत उद्या शक्तिप्रदर्शन; राऊतांचं होणार स्वागत
Web Title: Jio Offering Best Cheapest Plan With Up To One Month Validity Check Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..