esakal | Jio Phone Next: गणेश चतुर्थीला येणार रिलायन्सचा नवा स्मार्टफोन
sakal

बोलून बातमी शोधा

Jio Phone Next

Jio Phone Next: गणेश चतुर्थीला येणार रिलायन्सचा नवा स्मार्टफोन

sakal_logo
By
सुधीर काकडे

रिलायन्स (Reliance) आता स्मार्टफोनच्या बाजारात देखील उतरणार आहे. रिलायन्सने आपल्या एन्युअल जनरल मीटिंगमध्ये (AGM) जाहीर केल्या प्रमाणे लवकरच आपला स्मार्टफोन (Jio Phone Next) बाजारात घेऊन येणार आहे. जियो नेक्स्ट हा फोन गणेश चतुर्थीला बाजारात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. गुगल सोबत भागीदारी करत रिलायन्सने हा फोन तयार केला असून, अत्यंत कमी दरात हो फोन मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानूसार या फोनची किंमत फक्त ३,४४४ रुपये असणार आहे. येत्या १० सप्टेंबरला हा फोन लॉंच होणार आहे.

रिलायन्सच्या या नवीन फोन बद्दल माहिती देताना सर्वसामान्यांना परवडेल अशी या फोनची किंमत असेल असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं होत. जिओ-गुगलचा हा फोन गेमचेंजर ठरेल असं सांगितलं जात आहे. कारण, भारताला 2G मुक्त करुन 5G युक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं अंबानी यांनी या बैठकीदरम्यान सांगितलं. गेल्यावर्षी लॉकडाउनच्या काळात गुगल आणि जिओमध्ये सहकार्य करार झाला होता. ज्याची बरीच चर्चाही झाली होती.

हेही वाचा: आता तुम्हाला रांगेत उभं राहून सिमकार्ड घ्यावं लागणार नाही

विशेष म्हणजे रिलायन्सच्या या स्मार्टफोनचे फिचर्स हे अॅडव्हान्स असणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 हे प्रोसेसर असेल, तसेच २ आणि ३ GB रॅमचे पर्याय या फोनमध्ये असणार आहेत. स्टोअरेजचा विचार केल्यास १६ ते ३२ जीबी पर्यंतची स्टोअरेजची क्षमता या फोनमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ११ सह ५.५ इंचाचा एच डी रिव्हॉलुशन डिस्प्ले असणार आहे.

loading image
go to top