
Jio चे परवडणारे रिचार्ज प्लॅन, विना डेली लिमिट मिळतो 50GB पर्यंत डेटा
jio prepaid plan : करोना व्हायरसमुळे बऱ्याच दिवसांपासून आपल्यापैकी बऱ्याच जणांना घरातूनच काम करावे लागत आहे. घरून काम करताना येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे डेटा. जर कोणाकडे वाय-फाय नसेल तर त्याला फक्त डेटा वापरुनच काम करावे लागेल. परंतु यामध्ये डेटा खूप लवकर संपतो. जर तुम्हालाही हीच अडचण येत असेलतर आज आपण तीन वर्क फ्रॉम होम प्लॅन जाणून घेणार आहोत जे 50 जीबीपर्यंत डेटा देतात आणि तेही कोणत्याही मर्यादेशिवाय. जर तुम्ही जिओ (Jio) वापरकर्ते असाल, तर हे प्लॅन तुमच्यासाठी खूप चांगले आणि परवडणारे आहेत.
181 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये फक्त डेटा दिला जातो आणि तोही कोणत्याही मर्यादेशिवाय. या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 GB डेटा दिला जात आहे. जर तुम्ही घरून काम करत असाल आणि तुम्हाला डेली डेटा पुरेसा पडत नसेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.
हेही वाचा: ड्रायव्हिंग लायसन्स, RC घरी विसरलात? फोन वाचवेल तुमचा दंड
241 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 30 दिवसांची वैधता मिळते. हा रिचार्ज देखील केवळ डेटा-प्लॅन आहे. यामध्ये यूजर्सना 40 GB डेटा विना लिमिट दिला जात आहे. या प्लॅनमुळे युजर्सना घरातून कामातही खूप मदत होईल. यामध्ये इतर कोणताही लाभ दिला जात नाही.
301 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 30 दिवसांची वैधता दिली जात आहे. हा देखील केवळ डेटा प्लॅन आहे. यामध्ये यूजर्सना कोणत्याही मर्यादेशिवाय 50 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमुळे युजर्सना घरातून काम करण्यास खूप मदत होईल. यामध्ये कॉलिंग आणि एसएमएससारखा इतर कोणताही बेनिफिट दिला जात नाही.
हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण
Web Title: Jio Prepaid Plan For Work From Home Offers Upto 50gb Data With No Daily Limit Check Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..