ड्रायव्हिंग लायसन्स, RC घरी विसरलात? फोन वाचवेल तुमचा दंड, वाचा डिटेल्स | mParivahan App | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mparivahan app

ड्रायव्हिंग लायसन्स, RC घरी विसरलात? फोन वाचवेल तुमचा दंड

अनेक वेळा लोक त्यांच्या वाहनाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे जसे की RC आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवायला विसरतात, अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस अधिकारी चेकिंग दरम्यान तुम्हाला चलन किंवा दंड भरावा लागू शकतो. असे होऊ नये म्हणून mParivahan चे ॲप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या ॲपच्या मदतीने यूजर्स स्मार्टफोनमध्येच त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी डिजिटल फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतात.

हे ॲप ios आणि android दोन्हीसाठी उपलब्ध आहे आणि ते App Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते. दस्तऐवजाचे व्हर्चुअल स्वरूप देखील मूळ कागदपत्रांप्रमाणेच पूर्णपणे वैध आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले तर तुम्ही त्यांना या अॅपमध्ये असलेली कागदपत्रे दाखवू शकता.

ॲप असे डाउनलोड करा

 • हे ॲप तुम्ही अँड्रॉइड फोनवर गुगल प्ले स्टोअर आणि आयफोनवरील अॅपल स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.

 • येथे तुम्हाला mParivahaan नावाचे ॲप शोधावे लागेल,

 • त्यानंतर ते इंस्टॉल करावे लागेल.

 • व्हर्च्युअल आरसी डाउनलोड कसे करावे

 • mParivahaan चे ॲप उघडा,

 • वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट चिन्हावर क्लिक करा,

 • येथे तुम्हाला साइन इन पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागेल,

 • त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर otp मिळेल,

 • आता तुम्हाला ॲपच्या होमस्क्रीनवर जावे लागेल आणि आरसी ऑप्शनवर क्लिक करा

 • सर्च फील्डमध्ये वाहन क्रमांक टाकून सर्च करा

 • ॲपच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाशी संबंधित डेटा आपोआप सिंक होईल.

 • आता 'Add to dashboard' वर टॅप करून आरसी जोडू शकता.

हेही वाचा: वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाउनलोड करावे?

 • होमस्क्रीनवर असलेल्या आरसी टॅबवर क्लिक करा,

 • आता तुम्हाला सर्च फील्डमध्ये यव्हिंग लायसन्स नंबर टाकून सर्च करावे लागेल,

 • आता तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा सर्व डेटा अॅपमध्ये दिसेल,

 • आता तुम्हाला फक्त 'Add to dashboard'वर क्लिक करावे लागेल.

हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

Web Title: Keep Documents Like Driving License And Rc In Your Smartphone Using Mparivahan App Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
go to top