Jio vs Airtel | दररोज 2GB डेटा देणारे टॉप 10 रिचार्ज प्लॅन्स; पाहा यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio, Airtel best prepaid plans with unlimited calling and data

Jio, Airtel चे दररोज 2GB डेटा देणारे टॉप 10 रिचार्ज प्लॅन

कोरोनाच्या काळात सर्वांचा इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बरेच जण घरातून काम करत असल्याने देखील त्यांची इंटरनेट डेटाची दैनंदिन गरज वाढली आहे. दरम्यान Jio आणि Airtel या कंपन्या ग्राहकांसाठी अनेक किफायतशीर डेटा प्लॅन्स ऑफर करत असतात. आज आपण Airtel आणि Jio च्या अशा प्रीपेड प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत, जे दररोज 2GB डेटा देतात.

1. Jio चा 2,599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 365 दिवसांच्या कालावधीसाठी 10GB अतिरिक्त डेटासह दररोज 2GB डेटा ऑफर करतो, म्हणजे तुम्हाला एका वर्षात एकूण 740GB डेटा मिळतो. हे अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस तसेच Jio अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते.

2. Jio चा 888 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 84 दिवसांच्या कालावधीसाठी 5GB अतिरिक्त डेटासह दररोज 2GB डेटा ऑफर करतो, म्हणजेच तुम्हाला एका वर्षात एकूण 173GB डेटा मिळतो. हे अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस तसेच Jio अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देखील देते.

3. रिलायन्स जिओ 666 प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 56 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो, म्हणजे एकूण 112GB डेटा. हे अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस तसेच Jio अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देखील देते.

4. रिलायन्स जिओचा 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 84 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो, जो एकूण 168GB डेटा आहे. हे अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस तसेच Jio अॅप्सचे फ्री सब्स्क्रिप्शन देखील मिळते.

5. रिलायन्स जिओचा 444 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 56 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो, यामध्ये एकूण 112GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस तसेच Jio अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते.

6. रिलायन्स जिओचा 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 28 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो, जो एकूण 56GB डेटा आहे. तसेच अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस तसेच Jio अॅप्सचे फ्री सब्स्क्रिप्शन देखील मिळते.

7. Airtel चा 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 56 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो, जो एकूण 112GB डेटा आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स, दैनिक १०० एसएमएस, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनची मोफत एक महिन्याचे ट्रायल, डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलवर फ्री एक्सेस, फास्टॅग रिचार्जवर १०० रुपयांचा कॅशबॅक, विंक म्युझिकचा मोफत एक्सेस, फ्री हॅलोट्यून्स आणि अपोलो २४|७ सर्कल थ्री यांची मासिक सदस्यता देखील मिळते.

8. Airtel चा 698 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 84 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो, जो एकूण 168GB डेटा आहे. यात अमर्यादित व्हॉईस कॉल्स, दैनिक १०० एसएमएस, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनची मोफत एक महिन्याची ट्रायल, फास्टॅग रिचार्जवर १०० रुपयांचा कॅशबॅक, विंक म्युझिकचा मोफत एक्सेस, मोफत हॅलोट्यून्स आणि अपोलो 24|7 सर्कलचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

9. Airtel चा 449 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 56 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो, जो एकूण 112GB डेटा आहे. यात अमर्यादित व्हॉईस कॉल्स, दैनिक १०० एसएमएस, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनची मोफत एक महिन्याची ट्रायल, फास्टॅग रिचार्जवर १०० रुपयांचा कॅशबॅक, विंक म्युझिकचा मोफत एक्सेस, मोफत हॅलोट्यून्स आणि अपोलो 24|7 सर्कलचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

10. Airtel चा 298 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन 28 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो, जो एकूण 56GB डेटा आहे. यात अमर्यादित व्हॉईस कॉल्स, दैनिक १०० एसएमएस, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनची मोफत एक महिन्याची ट्रायल, फास्टॅग रिचार्जवर १०० रुपयांचा कॅशबॅक, विंक म्युझिकचा मोफत एक्सेस मोफत हॅलोट्यून्स आणि अपोलो 24|7 सर्कलचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

loading image
go to top