

Jio vs Starlink Satellite Internet India: Launch & Price Details
esakal
Jio vs Starlink Satellite Internet in India: भारतामध्ये आता सॅटेलाइट आधारित इंटरनेट (Satellite Based Internet) सर्विस सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू असून, लवकरच या क्षेत्रात मोठी क्रांती पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत एलॉन मस्क यांची कंपनी 'स्टारलिंक' (Starlink) आणि मुकेश अंबानींची कंपनी 'रिलायंस जिओ' (Jio) या दोन्ही कंपन्या अग्रस्थानी आहेत.
भारत सरकारने यापूर्वीच तीन प्रमुख कंपन्यांना यासाठीचे परवाने (Licenses) दिले आहेत, ज्यामध्ये स्टारलिंक, जिओ आणि युटेलसॅट वनवेब यांचा समावेश आहे. आता फक्त अंतिम सुरक्षा मंजुरी (Security Approval) आणि स्पेक्ट्रमचे वाटप होणे बाकी असून, त्यानंतर या कंपन्या आपली सर्विस प्रत्यक्षात सुरू करतील.