Jio Welcome Offer : तुमच्याकडं 4G सिम असलं तरी मिळणार 5G सेवा मोफत; जाणून घ्या कसं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5g reliance gio

Jio Welcome Offer : तुमच्याकडं 4G सिम असलं तरी मिळणार 5G सेवा मोफत; जाणून घ्या कसं?

रिलायन्स जिओची 5G सेवा गेल्या महिन्यातच लॉन्च झाली आहे. Jio ने देशातील महत्वाच्या शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध करून दिली आहे. Jio True 5G सेवा येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे 5G सेवा ही काही निवडक ग्राहकांसाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या रिलायन्स जिओची 5G सेवा दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई, बेंगलोर, नाथद्वारा आणि हैद्राबाद या शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने 5G वापरासाठी Jio Welcome Offer ठेवली होती. ही ऑफर फक्त काही वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध करून देण्यात आली होती.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याकडे Jio 5G मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच ही सेवा वापरण्यासाठी 5G नेटवर्क असणे गरजेचे आहे. वापरकर्त्याच्या जिओ नंबरवर 239 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रिचार्ज असणे गरजेचे आहे. या ऑफरमुळे वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा 1Gbps च्या वेगाने वापरण्यास मिळणार आहे.

Jio 5G मोफत कसे मिळवायचे?

जिओ वेलकम ऑफर निवडक वापरकर्त्यासाठीच उपलब्ध आहे. यासाठी युजर्सना नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. म्हणजेच, जर तुमच्या प्रीपेड किंवा पोस्टपेड सिमवर 239 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज असेल तर तुम्हाला 5G सेवा मिळू शकते.

हेही वाचा: Paytm Shares Crash : पेटीएमच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण; 1.07 लाख कोटींचे नुकसान, 'हे' आहे कारण

तुम्ही 5G सेवा मिळणाऱ्या शहरात राहत असाल तर, तुम्ही My Jio अॅपवरून तुम्हाला 5G सेवा मिळाली आहे की नाही ते तपासू शकता. तुम्हाला सेवा प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे पात्र स्मार्टफोन देखील असणे आवश्यक आहे. सध्या कंपनीने 5G साठी कोणताही खास प्लॅन सादर केलेला नाही.

अधिक शहरांमध्ये 5G लॉन्च केल्यानंतर, कंपनी नवीन योजना लॉन्च करू शकते. तोपर्यंत वापरकर्ते विनामूल्य 5G वापरू शकतात. सेवा वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये n28, n78, n258 बँड असणे आवश्यक आहे.