JioDive VR : Jio करणार Apple आणि Google ची सुट्टी, लाँच करणार सर्वात स्वस्त VR हेडसेट

Apple आणि Google हे जगातील आघाडीचे टेक ब्रँड
JioDive VR
JioDive VResakal

JioDive VR : Apple आणि Google हे जगातील आघाडीचे टेक ब्रँड आहेत. दोन्ही कंपन्या त्यांचे VR हेडसेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे तुम्हाला व्हरच्युल दुनियेत गेमिंगचा आनंद लुटता येईल.

JioDive VR
Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

पण Google आणि Apple त्यांचे VR हेडसेट 1000 ते 2000 डॉलर्समध्ये लॉन्च करू शकतात. पण आता जिओ सुध्दा रिंगणात उतरले आहे. Jio ने एक नवीन VR हेडसेट लॉन्च केला आहे. याचे नाव JioDive VR हेडसेट आहे. त्याची किंमत 1,299 रुपये आहे. हा ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येतो.

JioDive VR
Amazon Prime Video : 1 वर्षासाठी मोफत, नेटफ्लिक्सलाही या स्वस्त प्लॅनचा फायदा

JioDive VR हेडसेट Jio च्या अधिकृत वेबसाइट आणि JioMark वरून खरेदी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर पेटीएम वॉलेटवरून या हेडसेटच्या खरेदीवर 500 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. त्याच 100 रुपयांच्या अतिरिक्त सूट ऑफरचा आनंद घेता येईल.

JioDive VR
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

कमी किमतीचा VR हेडसेट

Apple आणि Google चे VR हेडसेट Jio पेक्षा किती वेगळे असतील हे येणारा काळच सांगेल. पण हे निश्चित आहे की Jio ने 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत VR हेडसेट लाँच करून बाजारात नक्कीच खळबळ माजवली आहे. जिओचा व्हीआर हेडसेट प्रामुख्याने आयपीएल क्रिकेट सामने पाहण्यासाठी सादर करण्यात आला आहे. पण येत्या काही दिवसांत अपडेट्स देता येतील. जिओ सिनेमा अॅपद्वारे समर्थित 360-डिग्री व्ह्यूइंग अँगलसह हा स्मार्टफोन-आधारित आभासी हेडसेट आहे.

JioDive VR
Women Health : आवळ्याचा रस प्यायल्याने महिलांना असा होतो फायदा

काय विशेष असेल

JioDive VR हेडसेटमध्ये 4.7 इंच आणि 6.7 इंचाचे स्मार्टफोन वापरले जाऊ शकतात. यामध्ये Android 9 आणि iOS 15 सर्वोत्तम स्मार्टफोनला सपोर्ट करेल.

Samsung, Apple, OnePlus, Realme, Vivo, Xiaomi, Poco, Nokia स्मार्टफोन Jio हेडसेटमध्ये वापरता येतील. तसेच, jioImmerse अॅप फोनमध्ये डाउनलोड आणि इंस्टॉल करावे लागेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com