esakal | आता जियोचे नेटवर्क डाऊन? #Jiodown ट्विटरवर ट्रेंड
sakal

बोलून बातमी शोधा

Jio

आता जियोचे नेटवर्क डाऊन? #Jiodown ट्विटरवर ट्रेंड

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोटी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्स जियोच्या ग्राहकांना आज मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सध्या #jiodown हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतोय. काही मिनिटांपासून हा ट्रेंड क्रमांक एकवर आहे. अनेक ग्राहकांनी जियोचे नेटवर्क डाऊन असल्याची तक्रार केली आहे. काही ग्राहकांनी म्हटलंय की, गेल्या काही तासांपासून जियोचे नेटवर्क काहीच काम करत नाहीये. तर काही ग्राहकांनी म्हटलंय की, फेसबुक, व्हाट्सऍपनंतर आता जियोचे नेटवर्क देखील डाऊन झालं आहे.

इंटरनेट आउटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरवर जिओ कनेक्शनमधील तक्रारींचे 4,000 रिपोर्ट आहेत आणि ते सातत्याने वाढताना दिसत आहेत. डाऊनडेक्टरवरील डेटा पाहता, बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास या तक्रारींची माहिती मिळू लागली आणि सुमारे एका तासात या तक्रारी वाढतच गेल्या असून सध्या शिगेला पोहोचू लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जियोची सर्व्हीस संपूर्ण देशात बाधित झालेली नाहीये. मात्र काही भागात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. गेल्या एक-दिड तासापासून ही अडचण येत आहे. कंपनीची टेक्निकल टीम याबाबत सध्या काम करत आहे. लवकरच ही समस्या दूर होईल, अशी अपेक्षा आहे. रिलायन्स जियोच्या ऍक्टीव्ह मोबाईल ग्राहकांची संख्या जुलैमध्ये 61 लाखांनी वाढली होती. जुलै अखेरपर्यंत जियोच्या मोबाईल कनेक्शनची संख्या 34.64 कोटी होती.

loading image
go to top