शेतात जाऊन पीक सर्वेक्षण करण्यासाठी कृषी खात्याकडून दरवर्षी कंत्राटी पद्धतीवर प्रतिनिधींची नियुक्ती केली जाते.
बेळगाव : शेती पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी यापूर्वी कृषी खात्याकडून सर्वेक्षण करून नंतर नोंद केली जात होती. मात्र, यापुढे शेतकरी स्वतः थेट पिकांची माहिती सातबारासाठी पाठवू शकणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना (Farmers) कृषी अधिकाऱ्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी राज्य शासनाने पीक सर्वेक्षण ॲप्लिकेशन (Crop Survey Application) मोबाईलवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.