Kawasaki Eliminator : ग्रँड एंट्री! तब्बल १० वर्षांनी आपली लाडकी Eliminator परत येतीय ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kawasaki Eliminator

Kawasaki Eliminator : ग्रँड एंट्री! तब्बल १० वर्षांनी आपली लाडकी Eliminator परत येतीय !

Kawasaki Eliminator : Kawasaki ने जपानमध्ये नवीन क्रूझर बाईक Kawasaki Eliminator 400 लाँच केली आहे. निन्जा 400 प्रमाणे ट्विन इंजिनची ताकद असलेली अद्ययावत क्रूझर मोटरसायकल सादर करण्यात आली आहे. या बाइकला स्टँडर्ड आणि एसई असे दोन ट्रिम ऑप्शन मिळतील. कावासाकीने एका दशकाहून अधिक काळानंतर एलिमिनेटर टॅग परत आणला आहे.

कावासाकी एलिमिनेटर 400 2 कावासाकी एलिमिनेटर 400 चं डिझाईन आधुनिक क्रूझर बाइकसारखी आहे, त्यात रेट्रो टच आहे. नवीन बाइकला गोल एलईडी हेडलॅम्प आणि एक स्लिम पेट्रोल टाकी मिळेल, जी एलिमिनेटरच्या मागील वर्जनची आठवण करून देईल. याशिवाय बाइकची टेलही जुन्या एलिमिनेटरसारखीच आहे.

बाईकच्या सीटची उंची 735 मिमी आहे, ज्यामुळे रायडरला राइडिंग करताना आरामदायक फिल येतो. सर्व-डिजिटल एलसीडी डिस्प्ले देखील आहे, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल बार स्टाइल टॅकोमीटर, गियर पोझिशन इंडिकेटर, घड्याळ, इंधन गेज, प्रेजेंट आणि सरासरी इंधन वापर, स्मार्टफोन मॅसेज आणि ब्लूटूथ इंडिकेटर यांसारखे ऑप्शन दिसतात.

राइडोलॉजी अॅपद्वारे स्मार्टफोनला बाइकशी कनेक्ट करता येईल. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्मार्टफोनवरील सूचना आणि बाईकची प्रत्येक माहिती स्मार्टफोनवर दिसेल. त्याच्या SE वेरिएंटमध्ये फ्रंट आणि रियर कॅमेरे देखील आहेत जे GPS सपोर्टसह येतात. यूएसबी-सी पॉवर सॉकेट, बिकिनी काऊल, फोर्क बूट सारखी वैशिष्ट्ये देखील या प्रकारात उपलब्ध असतील.

एलिमिनेटर 400 ला 399 cc ट्विन इंजिनचा सपोर्ट मिळेल. त्याच वेळी, बाईकच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन प्री-लोड-अॅडजस्टेबल रिअर शॉक ऍब्जॉर्बर्स उपलब्ध असतील. किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, जपानी बाजारात बाईकची किंमत 7,59,000 येन (सुमारे ₹ 4.71 लाख) आहे आणि SE प्रकारची किंमत 8,58,000 येन (सुमारे ₹ 5.33 लाख) आहे.