Kia Cars Domestic Sale And Export : मेड इन इंडिया कारची जगभर चलती

किआ भारतात बनवलेल्या गाड्या ९५ हून जास्त देशात एक्सपोर्ट करीत आहे
Kia Cars Domestic Sale And Export
Kia Cars Domestic Sale And Exportesakal

Kia Cars Domestic Sale And Export : नकुतीच किआ इंडियाकडून घोषणा करण्यात आली आहे की, त्यांनी आंध्र प्रदेशाच्या अनंतपूर मध्ये आपली मॅन्यूफॅक्चरिंग फॅसिलिटीमधून दोन लाखांहून जास्त गाड्या एक्सपोर्ट करण्याची किमया केली आहे. किआ भारतात बनवलेल्या गाड्या ९५ हून जास्त देशात एक्सपोर्ट करीत आहे. किआ सेल्टॉस इंडियन मार्केटमध्ये दुसरी सर्वात जास्त विकणारी मिडसाइज एसयूव्ही आहे.

Kia Cars Domestic Sale And Export
Citroen C3 Aircross : Hyundai Creta च्या तुलनेत Citroen C3 Aircross आहे दमदार! डिझाईनपासून इंजिनपर्यंतचे तपशील जाणून घ्या

किआ इंडिया ९५ हून जास्त देशात मेड इन इंडिया कार एक्सपोर्ट करते. ४ वर्षांपेक्षा कमी काळात दोन लाख गाड्यांची निर्यात केली आहे. तुम्हाला हे ऐकून हैराणी होईल की, फक्त किआ सेल्टॉसच्या एकट्या कारची १ लाख ३५ हजार ८८५ यूनिटची परदेशात डिस्पॅच करण्यात आली आहे.

Kia Cars Domestic Sale And Export
SHOCKING : ​मुंबईतील "या" हाँटेड ठिकाणांची तुम्हाला कल्पनाही नसेल....!

या प्रमाणे मिडसाइज एसयूव्ही किआ सेल्टॉसचे फक्त इंडियन मार्केटमध्ये नव्हे तर विदेशात सुद्धा बंपर डिमांड आहे. सेल्टॉस सोबत किआ इंडियन मार्केटमध्ये आपली सब मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सॉनेट, बजेट ७ सीटर एमपीव्ही कारन्स आणि लग्झरी एमपीव्ही कार्निवल सोबत प्रीमियम इलेक्ट्रिक कार किआ ईव्ही ६ विक्री करीत आहे.

Kia Cars Domestic Sale And Export
New Bike : या बाइकमुळे पेट्रोल आणि डिझेलचा खर्च वाचणार, फ्लिपकार्टवरून बुक करता येणार

सेल्टॉस जवळपास ४ वर्षापासून कंपनीची टॉप सेलिंग एसयूव्ही आहे. सेल्टॉसने कंपनीच्या एकूण एक्सपोर्टमध्ये ६८ टक्के आणि भारतीय मार्केटमध्ये विक्रीत ५३ टक्के योगदान दिले आहे. इंडियाचे चीफ सेल्स एन्ड बिझनेस ऑफिसर मायुंग सिक सोहन यांच्या म्हणण्यानुसार, भारतात मेकिंग, इनोवेटिंग आणि इन्वेस्टमेंट करताना सरकारच्या व्हिजनमध्ये योगदान देऊन आम्हाला गर्व वाटत आहे.

Kia Cars Domestic Sale And Export
Top 10 Budget Cars : खिशाला परवडणाऱ्या या बजेट 10 कार

भारत एक मॅन्यूफॅक्चरिंग हब म्हणून जागतिक स्तरावर एसयूव्हीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. किआ इंडियाला मिडल इस्ट, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका, मेक्सिको आणि आशिया पॅसिफिक रिजन सारख्या विदेशी बाजारात सेल्टॉस, सॉनेट आणि कारन्सची मागणी वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com