SHOCKING : ​मुंबईतील "या" हाँटेड ठिकाणांची तुम्हाला कल्पनाही नसेल....!

मुंबईत हॉन्ट प्लेस असतील तरी विश्वास बसणार नाही
SHOCKING
SHOCKINGesakal

SHOCKING : मुंबईत हॉन्ट प्लेस असतील तरी विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे की मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत, जिथं भूतप्रेत वास्तव्याच्या अफवा आणि चर्चा आहेत.

SHOCKING
Citroen C3 Aircross : Hyundai Creta च्या तुलनेत Citroen C3 Aircross आहे दमदार! डिझाईनपासून इंजिनपर्यंतचे तपशील जाणून घ्या

वृंदावन सोसायटी

वृंदावन सोसायटीच्या बिल्डिंग नंबर ‘६ ब’मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्यानंतर लोकांना त्या व्यक्तीच्या भूताकडून थापड मारल्याच्या घटना समोर येऊ लागल्या. त्यानंतर काही दिवसाने सोसायटीच्या वाचमॅनलादेखील रात्रीच्या वेळी जोरदार थापड पडल्याची घटना समोर आली. याशिवाय याठिकाणी लोकांना अन्य असाधारण हालचालींचा अनुभव येत होता.

SHOCKING
Upcoming Cars in May 2023 : Tata Altroz ​​iCNG ते Jimny पर्यंत या गाड्या होणार लॉन्च

आरे मिल्क कॉलनी

या कॉलनीला मुंबईतील भूतांचे सर्वात भयानक ठिकाण मानले जाते. या भागात रात्री १० वाजेनंतर एक महिलेचा आत्मा लोकांकडून लिफ्ट मागताना दिसत असे. येथे राहणारे लोक इतरांना सावध करतात की, ज्यांना या भयानक परिस्थितीपासून वाचायचे असेल तर त्यांनी रात्री १० वाजेनंतर या भागात जायचे नाही आणि जाणे गरजेचेच असेल तर कोणालाच लिफ्ट देऊ नये.

SHOCKING
Cars With 6 Airbags : कमी किंमतीत मिळतील 6 Airbags, पाहा किंमत

टावर आॅफ सायलेंस

एक विना छताचे टॉवर आहे, जिथे पारसी आपल्या धर्मानुसार मरणाºयाच्या शवाला अंतिम पडावासाठी ठेऊन जातात. सांगितले जाते की, याचा पहाडी रस्ता, कित्येक भूतांनी आणि आत्मांनी घेरलेला आहे. म्हणून रात्री या भागात जाण्याची हिंमत कोणी करत नाही

SHOCKING
Hybrid VS Electric Car : Hybrid आणि Electric कोणती कार आहे बेस्टम बेस्ट!

माहिम- डिसूजा चाळ

माहिमच्या डिसूजा चाळीमध्ये एका महिलेचे भूत दिसत असते. ही महिला विहिरीत पाणी भरताना पाण्यात पडून मृत्यु झाली होती. यानंतर लोकांनी चाळीच्या कॉरिडोरमध्ये या महिलेचा आत्मा फिरताना पाहिला होता. असे म्हटले जाते की, या विहिरीतून एका महिलेचा ओरडण्याचा आवाज येत असतो.

SHOCKING
Summer Makeup Tips : उन्हाळ्यात बर्फासारखा वितळतो मेकअप? या टिप्स वापरा आणि कमाल बघा

ठाकुर कॉलेज

या कॉलेजच्या बेसमेंटमध्ये बिपाशा बासुचा ‘आत्मा’ या चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती. यादरम्यान चित्रपटाच्या कॅमेरामॅनने एका फोटो फ्रेमला स्वत:च डाव्या आणि उजव्या बाजूने हलताना चित्रित केले होते. जे स्वत: बिपाशानेही पाहिले होते. बिपाशा सांगते की, फोटो फ्रेम कुणाचाही धक्का न लागता स्वत:च खाली पडली आणि डाव्या आणि उजव्या बाजूला सरकू लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com