KIA Seltos : 'किया मोटर्स'ने परत मागवल्या हजारो गाड्या; 'या' पार्टमध्ये आढळली त्रुटी.. कंपनी देणार बदलून!

KIA Cars Recalled : किया इंडियाने सांगितलं, की IVT ट्रान्समिशन असणाऱ्या 1.5 पेट्रोल सेल्टॉसच्या कार परत मागवण्यात आल्या आहेत.
KIA Seltos recalled
KIA Seltos recalledeSakal

KIA Seltos Called Back : किया इंडियाने आपली स्पोर्ट्स युटिलिटी कार 'सेल्टॉस' परत मागवली आहे. या गाडीच्या इलेक्ट्रॉनिक ऑईल पंप कंट्रोलरमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. कंपनीने सेल्टॉस पेट्रोल व्हेरियंटच्या 4,358 गाड्या परत मागवल्या आहेत. 28 फेब्रुवारी ते 13 जुलै 2023 दरम्यान तयार करण्यात आलेल्या गाड्यांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

KIA इंडियाने सांगितलं, की IVT ट्रान्समिशन असणाऱ्या 1.5 पेट्रोल सेल्टॉसच्या कार परत मागवण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक ऑईल पंप कंट्रोलरमध्ये (KIA Oil Pump Controller) असलेल्या त्रुटीमुळे त्याच्या परफॉर्मन्सवर प्रभाव पडू शकतो. यामुळे कंपनी मोफत ग्राहकांना हा सदोष पार्ट बदलून देणार आहे. (KIA Seltos)

याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला माहिती देण्यात आल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं. सोबतच, संबंधित गाड्यांच्या मालकांना देखील याबाबत माहिती देण्यात येत आहे. जर तुम्ही वरील कालावधीमध्ये तयार झालेली सेल्टॉस कार खरेदी केली असेल, तर तुम्हालाही कंपनीकडून कॉल येण्याची शक्यता आहे. (Seltos recalled)

KIA Seltos recalled
Yamaha Scooter Called Back : 'यामाहा'च्या तीन लाख स्कूटर्समध्ये तांत्रिक अडचण; खराब ब्रेकमुळे परत मागवल्या गाड्या.. जाणून घ्या

गेल्याच वर्षी कियाने भारतात सेल्टॉसचं फेसलिफ्ट (KIA Seltos facelift) व्हर्जन लाँच केलं होतं. या सेगमेंटमधील मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा आणि ह्युंडाईच्या क्रेटाला टक्कर म्हणून कियाने ही कार लाँच केली होती. किया सध्या आपली कार्निव्हल कार रिलाँच करण्याच्या तयारीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com