esakal | महागडे रिचार्ज करून त्रस्त आहात? मग तुमच्या आवडीचे हे स्वस्त रिचार्ज बघाच

बोलून बातमी शोधा

महागडे रिचार्ज करून त्रस्त आहात? मग तुमच्या आवडीचे हे स्वस्त रिचार्ज बघाच
महागडे रिचार्ज करून त्रस्त आहात? मग तुमच्या आवडीचे हे स्वस्त रिचार्ज बघाच
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनच्या बर्‍याच रिचार्ज योजना आहेत, ज्या आपण त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासू शकता. परंतु त्यांच्यामध्ये चांगली योजना निवडणे फार कठीण आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही योजनांबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 130 रुपये आणि 150 रुपयांपेक्षा कमी आहे.

हेही वाचा: तुम्हाला WhatsApp कोणी ब्लॉक केल्यानंतरही करा त्यांच्याशी चॅट; कसं ते जाणून घ्या

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन जवळपास 28 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉल, डेटा आणि एसएमएस 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीत देत आहेत. तिन्ही योजनांचे वेगवेगळे फायदे आणि डेटा मर्यादा आहेत. आणि याचबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रिलायन्स जिओचे 2 प्लॅन

रिलायन्स जिओ 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीसाठी 1 महिन्यांच्या वैधतेसह दोन योजना देते. पहिली योजना 129 रुपये आहे, ज्याची वैधता 28 दिवसांची आहे. या योजनेत एकूण 2 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. तसेच, 300 एसएमएस देखील यात उपलब्ध असतील. तसंच 149 रुपयांची योजना आहे, ज्याची वैधता 24 दिवसांची आहे परंतु दररोज 1 जीबी डेटा मिळतो. यासह, अमर्यादित कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील उपलब्ध असतील.

एअरटेलचे २ प्लॅन

एअरटेल 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन रिचार्ज प्लॅनदेखील देत आहे. एक म्हणजे 129 रुपयांची योजना, तर दुसरी 149 रुपयांची योजना. 129 रुपयांच्या योजनेत 24 दिवसांची वैधता आणि एकूण 1 जीबी डेटा उपलब्ध आहे. यासह 300 एसएमएसदेखील उपलब्ध असतील. एअरटेल देखील जिओप्रमाणेच 149 रुपयांचा प्लॅन देत आहे, परंतु त्याची वैधता 28 दिवसांची आहे. याव्यतिरिक्त, या योजनेत 2 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. यासह 300 एसएमएसदेखील उपलब्ध असतील.

हेही वाचा: आता एका क्लिकवर मिळवा कोविड रुग्णालयांची माहिती आणि नंबर; Truecaller नं लाँच केलं फिचर

VI चे प्लॅन

व्होडाफोनही 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन प्लॅन देत आहे. 129 रुपयांची योजना आहे, ज्यामध्ये 24 दिवसांची वैधता आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय 149 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या योजनेत 3 जीबी डेटा व एसएमएस उपलब्ध आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ