esakal | तुम्हाला WhatsApp कोणी ब्लॉक केल्यानंतरही करा त्यांच्याशी चॅट; कसं ते जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

तुम्हाला WhatsApp कोणी ब्लॉक केल्यानंतरही करा त्यांच्याशी चॅट; कसं ते जाणून घ्या
तुम्हाला WhatsApp कोणी ब्लॉक केल्यानंतरही करा त्यांच्याशी चॅट; कसं ते जाणून घ्या
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : फोटोंपासून तर डॉक्युमेंट पाठविण्यापर्यंत आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. मात्र जर तुम्हाला एखाद्या कारणास्तव एखाद्या मित्राने किंवा कुटूंबाच्या सदस्याने व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही आपल्याला एका विशिष्ट युक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण ज्या यूजरने आपल्याला ब्लॉक केले आहे त्यांना तुम्ही मेसेज पाठवू शकाल.

  • व्हॉट्स अॅपवर ब्लॉक करणाऱ्या युजरला मेसेज करण्यासाठी तुम्हाला स्वतःची आणि त्याच्या कॉमन मित्राची किंवा कुटुंबातील सदस्याची मदत घ्यावी लागेल.

  • आपल्याला आपल्या कॉमन मित्र किंवा कुटुंबातील सदस्यास एक व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यास सांगाण्याची आवश्यकता आहे ज्यामध्ये ते स्वत: तसेच आपण आणि आपल्याला ब्लॉक केलेल्या वापरकर्त्यास जोडेल.

हेही वाचा: आता घरबसल्या तुमच्या आधार कार्डवरून बनवा पॅनकार्ड; जाणून घ्या संपूर्ण स्टेप्स

  • यानंतर आपला कॉमन मित्र किंवा कुटुंबातील सदस्य ग्रुप सोडून जाईल. आता आपण आणि यूजर ज्याने आपल्याला ब्लॉक केले आहे तो या ग्रुपमध्ये राहील.

आता आपण या ग्रुपमध्ये मेसेज पाठवू शकता आणि ब्लॉकिंग मित्र किंवा कुटुंबातील सदस्याशी बोलू शकता.

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ