पालकांनो, वाढत्या सोशल मीडियामुळे तुमच्या मुलांवर वाईट परिणाम होताहेत का? जाणून घ्या काही तथ्य 

मोबाइल, स्मार्टफोन्स,आयफोन्स, कम्प्युटर, लॅपटॉप्स, टबलेट्स इत्यादि वस्तूंशिवाय तर तरुणाईला त्यांचं आयुष्यच निष्फळ वाटत. मात्र याच  टेक्नॉलजी आणि गॅजेट्सचे काही दुष्परिणाम बघयला मिळतात आहेत. तरुणाईमध्ये या सर्व गोष्टींचे वाईट परिणाम बघायला मिळतात.
मोबाइल, स्मार्टफोन्स,आयफोन्स, कम्प्युटर, लॅपटॉप्स, टबलेट्स इत्यादि वस्तूंशिवाय तर तरुणाईला त्यांचं आयुष्यच निष्फळ वाटत. मात्र याच  टेक्नॉलजी आणि गॅजेट्सचे काही दुष्परिणाम बघयला मिळतात आहेत. तरुणाईमध्ये या सर्व गोष्टींचे वाईट परिणाम बघायला मिळतात.

नागपूर : आजकालची तरुणाई एकमेकांशी बोलल्याशिवाय राहू शकतात. मात्र टेक्नॉलजी आणि गॅजेट्सशिवाय नाही. जगातल्या सर्व वयाच्या लोकांवर इंटरनेट आणि गॅजेट्सनं आपलं वर्चस्व निर्माण केलय. लोकं आपला एक क्षणही तंत्रज्ञानाशिवाय घालवू शकत नाहीत,. मोबाइल, स्मार्टफोन्स,आयफोन्स, कम्प्युटर, लॅपटॉप्स, टबलेट्स इत्यादि वस्तूंशिवाय तर तरुणाईला त्यांचं आयुष्यच निष्फळ वाटत. मात्र याच  टेक्नॉलजी आणि गॅजेट्सचे काही दुष्परिणाम बघयला मिळतात आहेत. तरुणाईमध्ये या सर्व गोष्टींचे वाईट परिणाम बघायला मिळतात.

तरुणाईमद्धे होणारे वाईट परिणाम:

  • गॅजेट्सच्या अतिवापरामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष
  • तणावाचे वाढते प्रमाण
  • अहम पणाचे वाढते प्रमाण
  • सोशल मीडियाचे वाढते प्रमाण
  • वाढते गुन्ह्यांचे प्रमाण
  • व्यसनांचे वाढते प्रमाण
  • मानसिक रोगांचे वाढते प्रमाण

 गॅजेट्सचे काही दुष्परिणाम:

मोबाइल आणि स्मार्टफोन 

जगातील तब्बल ८७ टक्के लोक आज हे आज मोबाइल वापरतात आहेत. लोक मोबाइलवर गाणी ऐकणे, व्हिडीओ बघणे, सोशल मीडिया वापरणे यासाठीच मोबाइलचा जास्त वापर करत असतात. २०११ साली जगात मोबाइल वापरणाऱ्या लोकांची संख्या ही १ करोंड २५ लाख इतकी होती मात्र आता ही संख्या तब्बल 600 करोंड इतकी झालीये. यामध्ये तब्बल ८० टक्के प्रमाण हे तरुण तरुणींचे आहे. त्यामुळे मोबाइल आणि स्मार्ट फोन हे व्यसन तरुणाईमध्ये आहे.

कम्प्युटर की लॅपटॉप

लोक कम्प्युटर आणि लॅपटॉपवर काम करण्यापेक्षा   गाणी ऐकणे,विडियो बघणे, सोशल मीडिया वापरणे यासाठीच जास्त वापर करत असतात  असा एका अहवालात सांगण्यात आलय.जगात तब्बल ९० करोंड लोक कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करतात. म्हणजेच जगातील एकूण ८० टक्के लोकं लॅपटॉप आणि कम्प्युटरचा वापर करतात.

सोशल मीडियाबाबत काही तथ्य

जगातील तब्बल ८४ टक्के लोक सोशाल मीडियाचा वापर करतात
जगातील तब्बल १०० कोटी लोक फेसबुकवर अॅक्टिव आहेत. 
फेसबूकवर १३ वर्षांखालील मूला-मुलींचं प्रमाण तब्बल ७५ लाख आहे. 
१० वर्षांखाली असणाऱ्या मूला-मुलींचं प्रमाण तब्बल ५० लाख इतकं आहे.
ट्विटरवर असणाऱ्या लोकांची संख्या एकूण ५० कोटी आहे.
गूगलवर दर सेकंदाला तब्बल ६३००० सर्च  येतात.

कशी आहे तरुणाईची आर्थिक बाजू
 
एका  अहवालानुसार स्मार्टफोन्स किंवा लॅपटॉप कम्प्युटर वापरणाऱ्या तरुणाईच्या पालकांचे महिन्याचे उत्पन्न ३५ हजार किंवा त्या खाली आहे त्यामुळे गॅजेट्स वापरणाऱ्या तरुणाईमद्धे सर्वाधिक लोक सर्वसामान्य घरातून येतात.

कोणाकडे किती गॅजेट्स? 

जगात गॅजेट्स वापरणाऱ्या तरुणाईपैकी ९९ टक्के तरुण लोकांकडे २ पेक्षा जास्त गॅजेट्स आहेत. त्यापैकी ४५.८ टक्के लोकांकडे २ गॅजेट्स आहेत, ३७ टक्के लोकांडे ३ आहेत तर १६. ३ टक्के लोकांकडे ३ आणि त्या पेक्षा जास्त गॅजेट्स आहेत.

तरुणाई किती वेळ वापरते गॅजेट्स?

जगात गॅजेट्स वापरणाऱ्या तरुणाईमध्ये एकूण ७०टक्के तरुण लोकांमध्ये ६७.४ टक्के लोक इंटरनेट किंवा गॅजेट्स एक दिवसात  ६ तासांपेक्षा जास्त वापरतात. तर २० टक्के लोक हे ४-६ तासांपर्यंत वापरतात. तर ७ टक्के लोक २-४ तास आणि १-२ तास वापरणाऱ्या लोकांची  फारच कमी आहे.

कशासाठी वापरतात हे गॅजेट्स ?

गॅजेट्स वापरणाऱ्या तरुणाई आपल्या एकूण वेळापैकी ६५ टक्के वेळ सोशल मीडियावर घालवतात. त्यापैकी २० टक्के लोक हे आपले गॅजेट्स अभ्यासासाठी वापरतात. १५ टक्के लोक हे आपल्या गॅजेट्सचा वापर संपर्कासाठी करतात. तर एकूण टक्केवारीच्या ६५ टक्के लोक या गॅजेट्सचा वापर मनोरंजनासाठी करत असतात. म्हणजेच तरुणाईमध्ये अभ्यासापेक्षा मनोरंजन जास्त महत्वाचे आहे असं समजते. चित्रपट, खेळ, इंटरनेट मध्ये गेमिंग, सोशल नेटवर्किंग, मित्रांसह गप्पा मारणे यासाठी हे गॅजेट्स वापरल्या जातात.

पुरुष जास्त गॅजेट्स वापरतात की महिला ?

 एकूण जितके  पुरुष गॅजेट्स वापरतात तर त्यापैकी १७ टक्के परूष अभ्यासासाठी,१३ टक्के पुरुष संपर्क साधण्यासाठी तर ७० टक्के पुरुष मनोरंजनसाठी सोशल मीडिया किंवा गॅजेट्स वापरतात. याउलट जितक्या महिला गॅजेट्स वापरतात त्यापैकी २५ टक्के महिला  अभ्यासासाठी,२० टक्के महिला संपर्क साधण्यासाठी तर ५५ टक्के महिला मनोरंजसाठी या गॅजेट्सचा वापर करतात. या मध्ये विद्यार्थी सर्वात जास्त गॅजेट्स मनोरंजनासाठी वापरतात.

गॅजेट्सवर किती अवलंबून? 

 एकूण टक्केवारीपैकी ६३.७ टक्के लोक हे या गॅजेट्सवर पूर्णत: अवलंबून आहेत. ३६.३ टक्के लोक हे सामन्यात: अवलंबून आहेत. गॅजेट्सवर जे अवलंबून नाहीत असं कोणीही नाही. त्यामुळे पुढील काळात गॅजेट्सशिवाय लोकांच जीवनच नाही असं म्हणता  येईल.

त्यामुळे आता तरुणाईला या सोशल मीडिया आणि गॅजेट्सच्या अतिवापरामुळे मानसिक रोगांचा सामना करावा लागतोय. अतिताण आणि अहमपणा यामुळे तरुण पिढी डिप्रेशन मध्ये जातेय. आणि याचाच परिणाम म्हणून तरुणाईमद्धे आत्महत्यांचं प्रमाणही वाढत चाललं आहे. दरम्यान तंत्रज्ञान आणि गॅजेट्स महत्वाचे आहेतच मात्र त्याच्या वाढत्या  प्रमाणाचे दुष्परिणाम जगातल्या तरुण पिढीवर होताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com