esakal | ही इलेक्ट्रिक सायकल एका चार्जमध्ये जाईल 100 किमी, जाणून घ्या डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

nexzu roadlark cargo electric bicycle

वाढलेल्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळात आपल्यासमोर असलेल्या सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक आहेत. हीच दोन कारणे आहेत ज्यांच्यामुळे भारताच्या वाहन क्षेत्रात मोठा बदल दिसून आला आहे. आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरला प्राधान्य देण्यास सुरूवात करीत आहेत.

ही इलेक्ट्रिक सायकल एका चार्जमध्ये जाईल 100 किमी, जाणून घ्या डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

वाढलेल्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळात आपल्यासमोर असलेल्या सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक आहेत. हीच दोन कारणे आहेत ज्यांच्यामुळे भारताच्या वाहन क्षेत्रात मोठा बदल दिसून आला आहे. आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरला प्राधान्य देण्यास सुरूवात करीत आहेत. परंतु आपल्याला पैसे आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी वाचवायच्या असतील तर आपल्यासाठी बाजारात इलेक्ट्रिक सायकलचा (Electric Bicycle) पर्यायही उपलब्ध हे. ज्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. भारतातील टू व्हिलर उत्पादक कंपनी नेक्सजू मोबिलिटीने रोडलार्क कार्गो (Nexzu Roadlark Cargo) नावाने आपली नवीन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. (know full features and price of nexzu roadlark cargo electric bicycle)

या कंपनीने सामान्य लोक तसेच डिलीव्हरी सर्विस संबंधित लोकांना टार्गेट करुन ही सायकल बनविली आहे. ज्यामध्ये कंपनीचे लक्ष सर्वात जास्त होम डिलीव्हरी हॉटेल, रेस्टॉरंट्स होम डिलिव्हरी, किराणा दुकान आणि इतर सेवा देणाऱ्या लोकांवर केंद्रित केले आहे. कारण या इलेक्ट्रिक सायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण 50 किलो वजन घेऊन प्रवास करू शकता. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक सायकलमध्ये दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एक फिक्स ठेवली गेली आहे आणि एक बदलली जाऊ शकते. या सायकलची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ घेते, त्यानंतर ती 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, ज्यामध्ये आपल्याला ताशी 25 किलोमीटरचा वेग मिळतो.

या रोडलार्क कार्गो इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने जी दोन बॅटरी पॅक दिले आहेत, त्यातील पहिली बॅटरी 5.2 एएचची आहे जी फिक्स असेल आणि दुसरी बॅटरी 8.7 असेल आणि ती बदलली जाऊ शकते.या इलेक्ट्रिक सायकलमध्ये ब्रेकिंग सिस्टम सुधारण्यासाठी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त ही सायकल सामान्य चार्जरने चार्ज करता येते. सायकल चार्जिंग संपल्यानंतर, ती सामान्य सायकलप्रमाणे चालवली जाऊ शकते.

हेही वाचा: अटी मान्य न केल्यास whatsapp होणार डिलीट

कंपनीने ही रोडलार्क इलेक्ट्रिक सायकल इतर इलेक्ट्रिक सायकलपेक्षा वेगळी दिली असून त्यास दोन राईडिंग मोड देण्यात आले आहेत ज्यामध्ये पहिला मोड पेडलेक आणि दुसरे थ्रॉटल मोड आहे. पहिला मोड एक स्पोर्टी मोड आहे ज्यामध्ये 75 किमीची रेंज देईल आणि दुसरा मोड एक इकॉनॉमी मोड आहे ज्यामध्ये सायकल 100 किमीची रेंज देईल. कंपनी ही बाईक देशभरातील 90 हून अधिक आऊटलेटमध्ये उपलब्ध असेल, याव्यतिरिक्त, जर तुम्हाला घरी बसून ही सायकल घ्यायची असेल तर आपण त्यासाठी ऑनलाईन ऑर्डर देखील देऊ शकता. 42 हजार रुपये सुरुवातीच्या किंमतीला ही इलेक्ट्रिक सायकल खरेदी करता येईल.

(know full features and price of nexzu roadlark cargo electric bicycle)

हेही वाचा: WhatsApp वापरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा...