esakal | फोनमधील अ‍ॅपच्या अनावश्यक परमिशन करा बंद, ही आहे सोपी पध्दत

बोलून बातमी शोधा

phone
फोनमधील अ‍ॅपच्या अनावश्यक परमिशन करा बंद, ही आहे सोपी पध्दत
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ऑनलाईन फसवणूकीच्या बातमी आपण बर्‍याचदा वाचतो आणि ऐकतो, परंतु आज आपण अशी माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्ही ऑनलाइन फसवणूकीपासून आपले संरक्षण करू शकाल आणि तुमची प्रायव्हसी देखील आबाधीत राहील. यासाठी कुठलेही अ‍ॅप डाउनलोड करताना सर्व परवानग्या देण्यापूर्वी आपण त्यांना काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून देशात ऑनलाइन फसवणूकीची प्रकरणे वाढली आहेत. सध्या बऱ्याच अशा अ‍ॅपआहेत ज्या ओटीपीसाठी तुमच्या इनबॉक्सचा एक्सेस घेतात. आणि तुमचा ओटीपी चोरी होण्याची शक्यता वाढते. थुमचा ओटीपी इतर कोणाला मिळाला तर त्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. अशा परिस्थीतीत तुम्ही डाऊनलोड करत असलेल्या अ‍ॅपला कोणत्या परमिशन दिल्या आहेत ते चेक करता येते आणि आवश्यकता पडल्यास ते बदलता देखील येते.

मोबाइल अ‍ॅप्स काय करतात

मोबाइल अ‍ॅप्समध्ये बरेच फीचर्स असतात आणि आपल्या सोयीसाठी त्यांना स्मार्टफोनच्या काही फीचर्समध्ये प्रवेश देखील मिळतो. उदाहरणार्थ, Google maps अ‍ॅप आहे, जे व्हॉईस सर्चसाठी माइकला परवानगी देते, जीपीएससाठी लोकेशन आणि लोकेशन शेयर करण्यासाठी संपर्क परवानगी मागते. परंतु आपण एखादे अ‍ॅप वापरत असाल जे फक्त फोटो क्लिक करण्याचे काम करते आणि टेक्स्ट मॅसेज किंवा माईकची परवानगी विचारत असेल तर त्याची त्या अपला आवश्यकता का आहे याचा विचार करा.

फोनमध्ये इंस्टॉल केलेल्या जुना अ‍ॅपच्या परमिशन्स तपासा

आपण फोनमध्ये इंस्टॉल असलेल्या जुन्या मोबाइल अ‍ॅपची परवानगी तपासण्यासाठी मोबाइल सेटिंग्ज वापरू शकता. यासाठी,आपल्या मोबाइल फोन सेटिंग्जवर जावे लागेल. यानंतर अ‍ॅप्सच्या सेक्शनमध्ये जा. यानंतर आपल्या स्क्रीनवरील सर्व अ‍ॅप्सची सूची उघडेल. ज्या अ‍ॅपची परवानगी आपण तपासू इच्छित आहात त्या अ‍ॅपवर क्लिक करा. यानंतर, अ‍ॅप अंतर्गत परवानगी नावाचा एक पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.

अशाप्रकारे अनावश्यक परवानग्या कढून टाका

आपल्या फोनमधील अ‍ॅपच्या आवश्यक नसलेल्या परवानग्या बंद करायची असेल तर त्या परवानग्या असलेल्या पर्यायावर क्लिक करा आणि ती बंद करा. उदाहरणार्थ, आपण लोकेशन फीचरवरील प्रवेश थांबवू इच्छित असल्यास परवानगीमधील लोकेशन या पर्यायावर क्लिक करा आणि डेनाईच्या पर्यायावर क्लिक करा.