चोरी झालेल्या स्मार्टफोनमधील डेटा घरबसल्या करा डिलीट, जाणून घ्या सोपी पध्दत

know how to delete data from lost smartphone Marathi article
know how to delete data from lost smartphone Marathi article

आजकालच्या काळात स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आज देशात लाखो लोक स्मार्टफोन वापरतात. तसेच त्याचा वापर फक्त कॉल किंवा मॅसेज करण्यापुरता मर्यादीत राहिलेला नाही. आज फोन त्यापेक्षा कितीतरी लहान-मोठ्या कामांसाठी वापरला जातो. दररोज अपडेट होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन आणि संगणक यांच्यामधील अंतर देखील कमी झाले आहे. 

आता फोनच्या मदतीने बँकिंग केले जाते,  व्हिझीओ, फोटो काढले जातात, एवढेच नाही तर इतर अनेक सॉफ्टवेअर फोनमध्ये वापरणे शक्य झाल्याने ऑफिसमधील महत्वाच्या कामांसंबधी कागद देखील फोनमध्ये असतात. या सर्व माहितीमुळे आपला फोन आपल्यासाठी खूपच महत्वाचा असतो. अशा परिस्थितीत समजा, जर तुमचा फोन कुठेतरी हरवला तर किती नुकसान होऊ शकते हे सांगण्याची आवश्यकता नाही. फोन हरवला तर एकवेळ ठिक,  परंतु त्यामध्ये फोटो, व्हिडिओ आवश्यक असलेल्या डेटा हरवला आणि त्याचा गैरवापर झाल्यास काय होईल? ही चिंता स्मार्टफोन वापरणार्‍या प्रत्येक माणसाला त्रास देते.

आजकाल फोनमध्ये खूप महत्वाची आणि खासगी माहिती असते ज्याची किंमत पैशांमध्ये करता येत नाही. जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुमच्या फोनमधील या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी तो डेटा त्या फोनमधून काढणे गरजेचे असते. म्हणून आज आपण आपल्या हरवलेल्या फोनमधून आपला पर्सनल डेटा कसा डिलीट करायचा याबद्दल  जाणून घेणार आहोत. 

यासाठी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही फोन किंवा कंप्यूटरवर इंटरनेट उघडावे लागेल

1 इंटरनेट उघडल्यानंतर वापरकर्त्यास इंटरनेट ब्राउझर https://mydevices.google.com वर जावे लागेल. ही लिंक उघडल्यानंतर, वापरकर्त्यास लॉग इन करण्याचा पर्याय दिसेल.

2 यानंतर आपल्याला त्याच जीमेल आयडीसह लॉगिन करावे लागेल, ज्यास आपण आपल्या जुन्या फोनवर म्हणजेच चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनमद्ये लॉग इन केले होते. या साठी तुमच्या चोरीला गेलेल्या फोनमध्ये देखील इंटरनेट सुरु असणे आवश्यक आहे.

3 एकदा वापरकर्त्याने लॉग इन केले की त्यानंतर वापरकर्त्याला प्ले साउंड, सिक्योर डिव्हाइस आणि इरेज डिव्हाइस इत्यादी पर्याय दिसतील.

4 आपल्या चोरलेल्या फोनमधील डेटा काढून टाकण्यासाठी तुम्हाला इरेज डिव्हाइस हा पर्याय निवडावा लागेल.

5 हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला जीमेल आयडीचा पासवर्ड विचारला जाईल.

6  तुम्ही जीमेल आयडीचा पासवर्ड इंटर केला की तुमच्या चोरीला गेलेल्या फोनमधील सर्व आवश्यक डेटा हटविला जाईल.

7  पण जर त्या चोरीला गेलेल्या फोनचे इंटरनेट चालू असेल तेव्हाच हे करणे शक्य आहे, जर फोनमध्ये इंटरनेट सुरु नसेल तर मात्र तुम्हाला डेटा काढून टाकता येणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com