esakal | तुमच्या एका क्लिकवर Google कसा शोधतो माहिती? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या एका क्लिकवर Google कसा शोधतो माहिती? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

तुमच्या एका क्लिकवर Google कसा शोधतो माहिती? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : जगातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत म्हणजे Google search. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसेल आणि आपण गुगल सर्च (Google search) केलं तर अवघ्या एक सेकंदात आपल्यासमोर त्याबद्दलचे शेकडो रिझल्ट्स असतात. एवढंच नाही तर त्याच्याशी निगडित गोष्टींचीही अचूक माहिती गुगलकडून मिळते. एका रिपोर्टनुसार एका दिवसात गुगलवर तब्बल ५.६ बिलियन म्हणजेच ५६० कोटी सर्च (Google Searches in a day) असतात. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात येत असूनही नेमकं तुमच्या प्रश्नाचं उत्तर गुगलकडून (Google Speed) इतक्या कमी वेळात मिळतं तरी कसं? याचबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (know How Google Find your search result within a second)

हेही वाचा: तुमच्या मोबाईलची Voice Quality कमी झालीये का? मग करून बघा हे उपाय

क्रॉलिंग (Crawling) -

ही एक सतत चालू राहणारी प्रोसेस आहे. Google सतत त्यामधले पेजेस क्रोल करत असतो आणि त्यामध्ये नवीन पेजेस जोडत असतो. यासाठी Google Bot नावाच्या एका सॉफ्टवेअरची मदत घेतली जाते. या सॉफ्टवेअरच्या मदतीनं कोणतं पेज पहिले शो करायचं आहे, कोणती माहिती समोर दाखवायची आहे हे गुगलकडून ठरवण्यात येतं. म्हणूनच आपण काही सर्च केल्यानंतर आपल्याला अगदी आपल्या मनासारखी माहिती मिळते.

या गोष्टींवर असते Crawling अवलंबून -

गुगल कोणत्याच वेबसाईटकडून क्रॉलिंगचे पैसे घेत नाही. मात्र क्रॉलिंग प्रोसेस सुरळीत पार पाडण्यासाठी तुमच्या वेबसाईटचं URL, वेबसाईटचं नाव तसंच तुमच्या वेबसाईटला होमपेज असणं आवश्यक आहे. क्रॉलिंग प्रोसेस याच गोष्टींवर अवलंबुन असते.

इंडेक्सींग (Indexing) -

google crawling नंतर Indexing ही प्रोसेस होते. यात गुगलकडून वेबपेजचं कन्टेन्ट चेक करण्यात येतो. आपण केलेल्या सर्चमध्ये इमेजेस आणि व्हिडीओ जोडले जातात. तसंच तुमच्या सर्चशी निगडित काही बातम्या असतील, जागा असतील तर ते जोडले जातात. ही सर्व माहिती google Index मध्ये सेव्ह केली जाते. म्हणूनच गुगलनं तुमच्या पेजला प्राधान्य द्यावं यासाठी आपल्या पेजचं टायटल नेहमी लहान ठेवा.

हेही वाचा: आता तुमचा स्मार्टफोन होणार अवघ्या ८ मिनिटांमध्ये फुल चार्ज

सर्व्हिंग रिझल्ट्स (Serving Result) -

जेव्हा आपण एखादी गोष्ट गुगलवर सर्च करतो तेव्हा तुमच्या प्रश्नानुसार गुगल रिझल्ट्सची पेज रँकिंग ठरवतो. गुगलमध्ये स्टोर असलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला रिझल्ट्स मिळतात.

(know How Google Find your search result within a second)