आता तुमचा स्मार्टफोन होणार अवघ्या ८ मिनिटांमध्ये फुल चार्ज

आता तुमचा स्मार्टफोन होणार अवघ्या ८ मिनिटांमध्ये फुल चार्ज

नागपूर : जगात बहुतांश लोकांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन (Android Smartphones) आहे. केवळ तरुणाई नाही तर आता मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्येही स्मार्टफोन वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. फेसबुक (Facebook) , इंस्टाग्राम (Instagram reels) आणि युट्युब (Youtube) यासांरख्या सोशल मीडिया अप्लिकेशन्समुळे (Social Media Applications) लोकं अगदी तासंतास स्मार्टफोन वापरतात. सतत स्मार्टफोनचा उपयोग केल्यानंतर मनोरंजन तर होतं मात्र काही वेळानंतर स्मार्टफोनची बॅटरी डिस्चार्ज (discharged battery problem) होते. त्यामुळे फोन वारंवार चार्ज करावा लागतो. पण आता काळजी करू नका. Xiaomi (Redmi) कंपनीनं असं अनोखं चार्जर आणलंय ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन ८ मिनिटांपेक्षाही कमी वेळात १०० टक्के चार्ज होणार आहे. (Xiaomi will introduced new Hyper Charge fast charging Technology)

आता तुमचा स्मार्टफोन होणार अवघ्या ८ मिनिटांमध्ये फुल चार्ज
या विमानात असणार हायटेक सोयी-सुविधा; फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Xiaomi कंपनीनं Mi 10 Ultra या स्मार्टफोनसोबत १२०W फास्ट चार्जिंग फिचर लाँच केलं होतं. यामध्ये ४००० mAh ची बॅटरी अवघ्या १५ मिनिटांच्या आत फुल चार्ज होते. मात्र आता यापुढे अजून एक पाऊल टाकत कंपनीनं २००W Hyper Charge fast charging Technology लाँच केली आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे यामुळे अवघ्या ८ मिनिटांच्या आत तुमचा फोन फुल चार्ज होणार आहे. विशेष म्हणजे या लेव्हलचं फास्ट चार्जिंग फिचर लाँच करणारी Xiaomi ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे.

आता तुमचा स्मार्टफोन होणार अवघ्या ८ मिनिटांमध्ये फुल चार्ज
Facebook किंवा Twitter च्या अकाउंटला व्हेरीफाईड ब्लु टिक हवीये?

Xiaomi कंपनीनं या संबंधीचा एकडेमॉन्स्ट्रेशन व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोनला या नवीन वायर्ड आणि वायरलेस हायपर चार्ज टेक्नॉलॉजीनं चार्ज करण्यात येत आहे. यात वायर्ड चार्जिंग सुरु केल्यावर अवघ्या ४४ सेकंदांमध्ये १० टक्के त्यानंतर ३ मिनिटांच्या आत ५० टक्के आणि ८ मिनिटांच्या आत १०० टक्के मोबाईल चार्ज होताना दिसत आहे.

Xiaomi कंपनीनं लाँच केलेलं हे Hyper Charge fast charging Technology Redmi आणि MI च्या सर्वच प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी असणार आहे. मात्र ही नवीन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मार्केटमध्ये लाँच करण्याबाबत अजूनही कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

(Xiaomi will introduced new Hyper Charge fast charging Technology)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com