आता मोबाईलची बॅटरी लवकर होणार नाही डिस्चार्ज; या टिप्स आणि ट्रिक्सचा करा वापर 

avc
avc

नागपूर : आपण सर्वजण स्मार्टफोन किंवा मोबाईल वापरतो. नातेवाईकांशी, मित्रांशी बोलण्यासाठी आपण मोबाईल वापरतो. मात्र अनेकदा फोनवर बोलताना मोबाईलची बॅटरी अचानक संपते किंवा नेहमी बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे अनेकजण बॅटरी बदलून घेतात. मात्र ही समस्या तुमच्या मोबाईलची असू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॅटरी डिस्चार्ज होण्यापासून वाचवण्याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत.   

GPS त्वरित बंद करा 

GPS म्हणजेच तुमच्या मोबाईलचं लोकेशन जर सुरु असेल तर यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. यूजर्सनी उपयोगानंतर ताबडतोब जीपीएस बंद करावा. तसंच ब्ल्यूटूथ जीपीएसनंतर सर्वाधिक बॅटरी वापरतो. असे सहसा पाहिले जाते की वापरकर्ते  इयरबड्स, स्पीकर्स किंवा फाईल्स करण्यासाठी ब्लूटूथ चालू करतात, जे वापरल्यानंतरही कायम राहतात, जे फोनची बॅटरी खर्च करतात. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांनी ब्लूटूथ वापरल्यानंतर ते बंद ठेवण्याची काळजी देखील घेतली पाहिजे. 

बॅकग्राऊंड अप्लिकेशन बंद करा 

बर्‍याचदा एक अप्लिकेशन उघडल्यानंतर आपण ती बंद न करता अनेक अप्लिकेशन ओपन करतो. मात्र आपणास माहिती आहे का की  आधी ओपन केलेले अप्लिकेशन बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपेल. हे टाळण्यासाठी यूजर्सनी सर्व बॅकग्राउंड अ‍ॅप्स मधूनमधून बंद केले पाहिजेत.

लाईव्ह वॉलपेपर वापरू नका 

लाईव्ह वॉलपेपर दिसण्यास अतिशय सुंदर दिसतात. मात्र यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. त्यामुळे लाईव्ह वॉलपेपरचा अति वापर करू नका. 

Always ON display बंद करा 

या फीचरमुळे तुम्हाला सतत पॉवर बटन दाबून मोबाईल ओपन करण्याची गरज पडत नाही. मात्र या फीचरमध्ये तुमच्या मोबाईलची स्क्रीन सतत ऑन असते. त्यामुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. त्यामुळे सेटिंग्समध्ये जाऊन हे फिचर ऑफ करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com