esakal | कोरोना काळातही बेजबाबदारीचा कळस, आरोग्य केंद्रात डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचीच दांडी

बोलून बातमी शोधा

doctor and employees not present at health center even in corona time in yavatmal }

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच बालकांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला होता. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या भेटीत भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराचे पितळ उघडे पडले.

vidarbha
कोरोना काळातही बेजबाबदारीचा कळस, आरोग्य केंद्रात डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचीच दांडी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची नाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांच्या हाती आहे. मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत डॉक्‍टरांसह कर्मचारी कर्तव्यावर दांडी मारण्यात तरबेज झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना मुख्यालयी हजर राहण्याच्या आदेशाला सरसकट हरताळ फासला जात आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्र अंनिसचा आरोप; संजय राठोड यांच्या पाठीशी जातपंचायत?

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच बालकांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला होता. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या भेटीत भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराचे पितळ उघडे पडले. या घटनेची गंभीर दखल घेत तेथे कार्यरत तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. तर, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेतील डॉक्‍टर, कर्मचारी धडा शिकण्याची अपेक्षा होती. मात्र, यात कोणताही बदल झाल्याचे दिसत नाही. खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी राळेगाव तालुक्‍यातील वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, दवाखाना वेळेपूर्वीच बंद करून कर्मचाऱ्यांसह डॉक्‍टरांनी घरचा रस्ता पकडल्याचे विदारक चित्र त्यांना दिसले. त्यामुळे संताप व्यक्त करीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

हेही वाचा - भयंकर! मुलींची निर्वस्त्र पूजा करणारी टोळी जेरबंद; भोंदूबाबाला अटक

एकूणच यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांच्या दांडीमुळे पूर्णत: आजारी पडले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची आहे. मात्र, डॉक्‍टर प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नाहीत. अधिकारीच येत नसल्याची संधी साधून इतर कर्मचारीही दांडी मारण्यात तरबेज झाले आहेत. कर्मचारीच उपचारासाठी आलेल्या रुग्णांना गोळ्या, औषधी देऊन बोळवण करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नेटवर्कअभावी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांच्याशी मोबाइलवर संपर्क होऊ शकला नाही.