तुम्हीही घरी स्मार्ट डिव्हाईसेस वापरता? मग अशा पद्धतीनं ठेवा त्यांना सुरक्षित

टीम ई सकाळ 
Friday, 19 February 2021

हे स्मार्ट डिव्हाईस वापरताना किंवा हाताळताना आपण त्यांची योग्य ती काळजी घेतो का? अनेक जण या हे डिव्हाईस वापरताना त्यांना सुरक्षितपणे वापरत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हे स्मार्ट डिव्हाईस वापरण्याबद्दलच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. 

नागपूर : जगात नवनवीन टेक्नॉलॉजी येतेय तसं संपूर्ण जग स्मार्ट बनत चाललंय. आधी मोबाईल फोन स्मार्ट झाले आणि आता हळूहळू इतर सर्वच गोष्टी स्मार्ट बनत चालल्या आहेत. अगदी हातातील घड्याळापासून तर फ्रिज-टीव्हीपर्यंत सर्व वस्तू स्मार्ट झाल्या आहेत. इतकंच नाही तर आपल्या एका आवाजावर आपल्या जे हवं ते गाणं वाजवणारे, गोष्ट सांगणारे अगदी आपली माफीसुद्धा मागणारे स्मार्ट डिव्हाईस आहेत. मोठमोठ्या नामवंत कंपन्या स्मार्ट डिव्हाईसेस तयार करतात. मात्र हे स्मार्ट डिव्हाईस वापरताना किंवा हाताळताना आपण त्यांची योग्य ती काळजी घेतो का? अनेक जण या हे डिव्हाईस वापरताना त्यांना सुरक्षितपणे वापरत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हे स्मार्ट डिव्हाईस वापरण्याबद्दलच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. 

...अन् ट्रॅक्टर वर स्वार होऊन वधू पोहोचली मंडपात; शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता उचललं पाऊल

तुमचं डिव्हाईस ब्रँडेड असावं 

तुमच्या स्मार्ट डिव्हाईसला सुरक्षित ठेवण्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे तुमचं डिव्हाईस हे चांगल्या आणि टिकाऊ कंपनीचं असावं. हे लोकल डिव्हाईसेस तुम्हाला धोका देऊ शकतात. तसंच लोकल डिव्हाइसेस टिकाऊ नसतात. आजकाल गुगल, यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे स्मार्ट डिव्हाईस उपलब्ध आहेत. या डिव्हाईसेसना गॅरेंटी आणि वॉरंटीही असते त्यामुळे हे दीर्घकाळ टिकून राहतात. 

पासवर्ड काळजीपूर्वक ठेवा 

आजकालच्या प्रत्येक स्मार्ट डिव्हाईसमध्ये पासवर्ड हा असतोच. कुठल्याही वस्तूला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डची गरज असतेच. त्यामुळे हा पासवर्ड ठेवताना काळजीपूर्वक ठेवा. पासवर्ड सेट करताना तो सहज अनोळखी व्यक्तीला ओपन करता येणार नाही ना याची काळजी घ्या. तसंच स्वतःला नेहमी लक्षात राहील असा पासवर्ड ठेवा. तसंच नेहमी पासवर्ड बदलत राहा. यामुळे तुमच्या स्मार्ट डिव्हाईसला कोणीही खराब करणार नाही. 

इंटरनेट स्पिडकडे लक्ष द्या 

इंटरनेट आणि स्मार्ट डिव्हाईसेसचा अतूट संबंध आहे. त्यामुळे जर तुम्ही स्मार्ट डिव्हाईस वापरत आहात तर तुमच्या इंटरनेटची स्पीड चांगली असणं आवश्यक आहे. तसंच तुम्ही वापरत असलेलं इंटरनेट हे सुरक्षेच्या दृष्टीनं चांगलं आहे की नाही हे बघणंहे महत्वाचं आहे. लोकल नेट वापरल्यामुळे हॅकर्स तुमच्या डिव्हाईसला हाक करू शकतात. त्यामुळे इंटरनेट चांगल्या कंपनीचं असणं आवश्यक आहे. 

सिंगल हॅन्ड उपयोग 

जर तुम्हाला तुमचं स्मार्ट डिव्हाईस सुरक्षित ठेवायचं असेल तर त्या डिव्हाईसला अनोळखी व्यक्तींच्या हातात लागू देऊ नका. तसंच त्यांना तुम्ही एकटेच  करा. यामुळे ते सुरक्षित राहतील आणि अधिक काळ टिकून राहतील. 

'अमिताभ बच्चन अन् अक्षय कुमारचे शूटींग बंद पाडू, मोदी सरकारच्या विरोधात त्यांची टीवटीव का...

आपल्या स्मार्ट डिव्हाईसची वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहा. जर तुमचे स्मार्ट डिव्हाईस कुठल्या ॲपच्या माध्यमातून चालत आहेत तर त्यांचं टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन जरूर घ्या. तसंच  ऑनलाइन स्मार्ट डिव्हाईस खरेदी करताना पूर्ण विचारपूस करून पडताळूनच खरेदी करा. यामुळे तुमचे डिव्हाईस सुरक्षित राहतील.  

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know how to take care of your Smart devices Nagpur News