esakal | 'अमिताभ बच्चन अन् अक्षय कुमारचे शूटींग बंद पाडू, मोदी सरकारच्या विरोधात त्यांची टीवटीव का थांबली?'
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole criticized amitabh bachchan and akshay kumar in bhandara

आता देखील त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात टीवटीव करायला पाहिजे. आम्ही त्यांचे महाराष्ट्रातील शूटींग बंद पाडू, असा इशारा काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

'अमिताभ बच्चन अन् अक्षय कुमारचे शूटींग बंद पाडू, मोदी सरकारच्या विरोधात त्यांची टीवटीव का थांबली?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भंडारा : अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी टीवटीव करत होते. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना लोकशाहीच्या मार्गाने टीका करत होते. आता मोदी सरकार इतके अत्याचार करत आहेत. मात्र, हे दोन्ही अभिनेते गप्प का बसले आहेत? आता देखील त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात टीवटीव करायला पाहिजे. आम्ही त्यांचे महाराष्ट्रातील शूटींग बंद पाडू, असा इशारा काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. आज भंडाऱ्यामध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यालाच पाठिंबा देण्यासाठी आज भंडाऱ्यात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते.
दरम्यान, काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांवर सर्वाधिक अत्याचार झाले आहे. काँग्रेसला शेतकऱ्यांचा कधीच कळवळा नव्हता. काँग्रेस ही शेतकऱ्यांसाठी नेहमी पुतणा मावशीच राहिली आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी असे बोलू नये, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

तसेच विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील नाना पटोलेंवर टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष पद पहिल्यांदा मिळाल्यामुळे नाना पटोले मोठ्या सेलिब्रिंटींवर टीका करून पब्लिसिटी स्टंट करत असलायचे दरेकर म्हणाले.