आधार कार्डवरील तुमचा फोटो आवडत नाहीये? मिनिटात बदला, जाणून घ्या प्रोसेस | Aadhaar Card | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aadhaar Card

Aadhaar Card: आधार कार्डवरील तुमचा फोटो आवडत नाहीये? मिनिटात बदला, जाणून घ्या प्रोसेस

Aadhaar Card Photo Update: बँकेत खाते उघडायचे असेल अथवा नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल, तर प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड गरजेचे आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा उपयोग होतो. तुम्ही घरबसल्या आधार कार्डवरील नाव, पत्ता सहज बदलू शकता. अनेकांना आधार कार्डवरील फोटो आवडत नाही. तुम्हाला देखील तुमच्या आधारवरील फोटो आवडत नसल्यास काळजी करू नका. तुम्ही सहज ओळखपत्रावरील फोटो बदलू शकता.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Aadhaar Card वरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्हालाही Aadhaar Card कार्डवरील फोटो बदलायचा असल्यास त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या.

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे. Unique Identification Authority of India च्या मदतीने तुम्हाला आधारवरील नाव, मोबाइल नंबर, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती सहज बदलता येईल. परंतु, यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. तर या ओळखपत्रावरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जावे लागेल.

हेही वाचा: Smart TV Offer: भन्नाट ऑफर! ५५ इंच स्मार्ट टीव्ही चक्क अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा डिटेल्स

आधारवरील फोटो बदलण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

  • आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल.

  • येथे तुम्हाला आधार सेक्शनमध्ये जाऊन आधार एनरोलमेंट अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

  • त्यानंतर हा फॉर्म भरून जवळील आधार सेंटरवर जमा करा.

  • या प्रक्रियेसाठी तुम्हाला १०० रुपये खर्च करावे लागतील.

  • या प्रक्रियेनंतर तुम्हाला एक पावती देखील दिली जाईल.

  • पावतीवरील यूआरएन नंबरचा वापर करून तुम्ही आधार अपडेट झाले आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

  • यानंतर काही दिवसात अपडेटेड आधार कार्ड तुमच्या घरी येईल.

हेही वाचा: Lensa AI: दीपिका, सईचा हा अ‍ॅनिमे लूक आला तरी कुठून? पाहा डिटेल्स

टॅग्स :Aadhaar Card