तुम्हालाही हवीये ट्विटर अकाउंटवर ब्लू टिक? जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस | Twitter Blue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter

Twitter Blue: तुम्हालाही हवीये ट्विटर अकाउंटवर ब्लू टिक? जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस

Twitter Blue Relaunch: मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने पुन्हा एकदा आपली पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस Twitter Blue ला लाँच केले आहे. या पेड सर्व्हिससाठी तुम्हाला ८ डॉलर खर्च करावे लागतील. या पेड सर्व्हिसचा फायदा घेतल्यास तुमचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाय होईल. सोबतच, तुम्हाला इतर फीचर्सचा देखील फायदा मिळेल. कंपनीने काही बदल करत ब्लू टिक सर्व्हिस लाँच केली आहे. यामुळे आता अधिकृत लोकांनाच ब्लू टिक मिळणार आहे.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Blue Tick Verification साठी काय आहेत नियम?

ट्विटर अकाउंट व्हेरिफाय करायचे असल्यास तुम्हाला सर्वात प्रथम तुमची अथवा तुमच्या कंपनीची अधिकृत वेबसाइटची माहिती द्यावी लागेल. तसेच, सरकारी ओळखपत्र आणि अधिकृत ईमेल आयडी देखील द्यावा लागेल. याशिवाय, व्हेरिफिकेशनसाठी तुमचे अकाउंट प्रसिद्ध कंपनी अथवा व्यक्तीशी संबंधित असणे गरजेचे आहे. तुमच्याबाबत माहिती असलेल्या न्यूज आर्टिकल्सची लिंक, गुगल ट्रेंड सर्च हिस्ट्री, विकिपिडिया रेफ्रेंस इत्यादी गोष्टी द्यावी लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मागील ६ महिन्यांपासून ट्विटरवर सक्रीय असणे देखील गरजेचे आहे.

हेही वाचा: Twitter Blue: प्रत्येकाला मिळणार ब्लू टिक, ट्विटरने पुन्हा लाँच केली पेड सर्व्हिस; मोजावे लागतील 'एवढे' पैसे

व्हेरिफिकेशनसाठी अशाप्रकारे करता येईल अ‍ॅप्लाय

  • ब्लू टिकसाठी तुम्हाला अकाउंटच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल. येथे "request verification" वर क्लिक करा. आता "Verified" सेक्शन दिसेल.

  • त्यानंतर Start Now वर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला गव्हर्मेंट, न्यूज ऑर्गनाइजेशन, बिझनेस आणि ब्रँड असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

  • आता तुमची अधिकृत वेबसाइट, आर्टिकल्स, सरकारी ओळखपत्र व इतर माहिती सबमिट करावी लागेल.

  • या प्रक्रियेनंतर काही दिवसात तुम्हाला अकाउंट व्हेरिफाय होईल की नाही, याबाबत ट्विटरकडून मेल येईल.

पेड सर्व्हिस घेणाऱ्यांना मिळेल खास फीचर्सचा फायदा

Twitter Blue पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस घेतल्यास तुम्हाला ब्लू टिक मार्क मिळेल. याशिवाय, कंपन्यांना गोल्ड चेकमार्क आणि सरकारी संस्थांना ग्रे चेकमार्क मिळेल. यूजर्स १०८०p क्वालिटीमध्ये व्हीडिओ शेअर करू शकतात. याशिवाय, एडिट ट्विट फीचरचा देखील यूजर्सला फायदा मिळेल. विशेष म्हणजे या यूजर्सला इतरांच्या तुलनेत जाहिराती कमी दिसतील.

टॅग्स :Twitter