वैयक्तिक डाटा आता होणार नाही चोरी; अशा रीतीनं करा आधार कार्ड लॉक आणि अनलॉक

वैयक्तिक डाटा आता होणार नाही चोरी; अशा रीतीनं करा आधार कार्ड लॉक आणि अनलॉक

नागपूर : आजच्या काळात आपल्या आयुष्यात कामाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड. बँकेची कामं, पासपोर्ट (Online Passport), रेशन कार्डची (Online ration Card) कामं, सरकारी योजनांचा लाभ (Online Government schemes) अशा एक ना अनेक कामांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची गरज पडते. अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाकडे आधार कार्ड (Aadhar card update) आहे. मात्र सध्याच्या काळात आधार कार्डशी निगडित नागरिकांचा वैयक्तिक डाटा चोरी होण्याच्या घटना वाढतच चालल्या आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मात्र आता घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आधार कार्डला लॉक (how to lock aadhar card) किंवा अनलॉक (how to unlock aadhar card) करण्याच्या टिप्स (aadhar security tips) देणार आहोत. (know how to lock aadhar card for safety and security purpose)

वैयक्तिक डाटा आता होणार नाही चोरी; अशा रीतीनं करा आधार कार्ड लॉक आणि अनलॉक
'तो' बिबट्या नक्की गेला तरी कुठे? तीन दिवस उलटूनही शोध लागेना

आधार कार्ड तयार करताना तुमचा फोटो, तुमचा पत्ता, तुमचे फिंगर प्रिंट्स तसंच वयक्तिक माहिती घेतली जाते. त्यामुळे जर हॅकर्सनी तुमच्या आधार कार्डचा डाटा चोरी केला तर ही सर्व माहिती लीक होऊ शकते. त्यामुळेच आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याची गरज आहे.

असं करा आधार कार्ड लॉक

  • यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील मेसेज अप्लिकेशन ओपन करा.

  • यानंतर 1947 या नंबरवर GETOTP टाईप करून SMS पाठवा.

  • यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.

  • यानंतर पुन्हा LOCKUID टाईप करून 1947 या नंबरवर पाठवा.

  • अशा पादशातीन तुमचं आधार कार्ड लॉक होईल.

वैयक्तिक डाटा आता होणार नाही चोरी; अशा रीतीनं करा आधार कार्ड लॉक आणि अनलॉक
आता तुमचा स्मार्टफोन होणार अवघ्या ८ मिनिटांमध्ये फुल चार्ज

आधार कार्ड अनलॉक करण्याची पद्धत

  • आधार कार्ड अनलॉक करण्यासाठी आपल्या फोनवर मेसेज अप्लिकेशन ओपन करा.

  • यानंतर रजिस्टर नंबरवरून 1947 या नंबरवर GETOTP टाईप करून SMS पाठवा.

  • यानंतर तुम्हाला OTP येईल.

  • यानंतर UNLOCKUID तुमचा आधार नंबर आणि OTP टाईप करून 1947 वर SMS करा.

  • अशा पद्धतीनं तुमचं आधार कार्ड अनलॉक होईल.

(know how to lock aadhar card for safety and security purpose)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com