esakal | आता WhatsApp वर डिलीट केलेले मेसेजही वाचा, 'हा' आहे सोपा मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp

आता WhatsApp वर डिलीट केलेले मेसेजही वाचा, 'हा' आहे मार्ग

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर एखाद्याने तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला असेल, परंतु तुम्ही तो वाचण्यापूर्वी डिलीट केला गेला असेल तर आशावेळी तो मेसेज नेमका काय होता या बद्दल तुम्हाला उत्सुकता लागते. अशावेळी तुम्हाला जर त्या मेसेजमध्ये काय होते ते जाणून घ्यायचे असेल. तर आज आपण काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला डिलीट केलेला मेसेज वाचता येईल. (know-how-to-read-whatsapp-deleted-message-marathi-article)

डिलीट केलेला मेसेज कसा वाचायचा

  • डिलीट केलेला मेसेज वाचण्यासाठी वापरकर्त्याला पहिल्यांदा WhatsApp Delete message अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल.

  • गुगल प्लेस्टोअर अ‍ॅपवर बर्‍याच व्हॉट्सअ‍ॅप डिलीट केलेले मेसेज अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यामुळे वापरकर्त्याला प्रथम हे अ‍ॅप इंस्टॉल करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला या अ‍ॅपला परवानगी द्यावी लागेल. मग वापरकर्त्याला काही व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्स कराव्या लागतील.

  • त्यासाठी सर्व प्रथम, आपल्याला व्हॉट्सअॅप उघडावे लागेल, जिथे आपल्याला तीन डॉट दिसतील, ज्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल.

  • नंतर सेटिंग पर्यायांखाली डेटा आणि स्टोरेज वर क्लिक करा. यानंतर, मीडिया ऑटो डाउनलोडसाठी परवानगी द्यावी लागेल. यामुळे आपल्या सर्व फायली आपोआप डाउनलोड होतील. त्यानंतर आपण मेसेज आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ पुन्हा डाऊनलोड करु शकाल.

  • या नंतर जर कोणी मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप पाठवून डिलीट केली असेल तर त्या नंतर आपण डाउनलोड केलेले तेच अॅप उघडावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅप डिलीट अ‍ॅप मध्ये तुम्हाला डिलीट केलेला मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडिओ दिसेल. अशा प्रकारे ते रिकव्हर करता येईल.

टीप - व्हॉट्सअ‍ॅप हटविलेले मेसेजेस वाचण्यासाठी कोणतेही अधिकृत अ‍ॅप उपलब्ध नाही. या कामात थर्ड पार्टी अॅप आपल्याला मदत करू शकताक. परंतु वापरकर्त्याने स्वत: च्या जोखमीवर थर्ड पार्टी अ‍ॅप वापरायला हवे. अले अॅप हे तुमच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी धोका असू शकतात.

(know-how-to-read-whatsapp-deleted-message-marathi-article)

हेही वाचा: Good News: Whatsapp ग्रुप कॉलमध्ये मिळणार मोठी सवलत

loading image