Truecaller मध्ये करा कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस | Truecaller Call Recording | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

truecaller

Truecaller मध्ये करा कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

स्मार्टफोन वापरणारे बहुतेक वापरकर्ते त्यांच्या फोनमध्ये Truecaller चा वापर करतात. जर तुमच्या फोनमध्ये Truecaller असेल तर तुम्ही Truecaller द्वारे कॉल रेकॉर्डिंग देखील करू शकता. ते कसे करता येईल हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

यामध्ये 2018 मध्ये रेकॉर्डिंग फीचर रोल आउट करण्यात आले होते, 2018 मध्ये Truecaller ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर एक फीचर आणले होते, ज्याने फक्त निवडक वापरकर्त्यांना इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल रेकॉर्ड करता येत होते. म्हणजेच काही वापरकर्तेच या सुविधेचा लाभ घेऊ शकत होते. त्यावेळी ही सुविधा फक्त त्या ग्राहकांसाठी उपलब्ध होती ज्यांनी Truecaller सब्सक्रिप्शन घेतले असेल होते. म्हणजेच हे फीचर पैसे देऊन वापरता येत होते. पण आता जवळजवळ तीन वर्षांनंतर, Truecaller ने एक अपडेट आणले आहे जे पैसे भरणाऱ्या आणि न भरणाऱ्या दोन्ही ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. म्हणजेच आता सर्वच वापरकर्ते हे फीचर वापरु शकतात.

हे फीचर वापरण्यासाठी मात्र काही अटी आणि शर्तीं पाळाव्या लागणार आहे. यासाठी अट अशी आहे की, फक्त Truecaller चे Android वापरकर्ते ही सुविधा वापरू शकतात. हे फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना Android 5.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणारा Android स्मार्टफोन आवश्यक असेल.

हेही वाचा: BSNL चा 29 रुपयांचा प्लॅन; मिळेल अनलिमीटेड कॉलिंगसह 1GB डेटा

या डिव्हाईसवर चालणार नाही फीचर

Truecaller ने सपोर्ट पेजवर स्पष्टपणे सांगितले आहे की, कॉल केलेल्या वापरकर्त्यास त्यांचा कॉल रेकॉर्ड होत असल्याची माहिती दिली जाणार नाही. तसेच, कंपनी म्हणण्यानुसा वापरकर्ता हेडफोन वापरत असतील तेव्हा मात्र कॉल रेकॉर्ड केला जाणार नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, Truecaller चे कॉल रेकॉर्डिंग फीचर सर्व Android स्मार्टफोनवर उपलब्ध नाही. कंपनीने अशा स्मार्टफोन्सची यादी दिली आहे ज्यावर हे फीचर उपलब्ध नाही.

Google Nexus आणि Google Pixel डिव्हाइसेस Android 5- 8.1

Motorola G4, Moto सिरीज आणि Motorola स्मार्टफोन- Android 5 - 8.1

Redmi Note 5 स्मार्टफोन-Android 8.1

Xiaomi Mi 10 Lite आणि Redmi Note 7- Android 9 – 12

Samsung J7 Max स्मार्टफोन- Android 5 - 8.1

Oneplus 6 स्मार्टफोन-Android 9 – 12

POCO F2 PRO आणि Poco X3 स्मार्टफोन्स - Android 9 – 12

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

कॉल रेकॉर्ड कसे कराल

आता आम्ही तुम्हाला Truecaller वर कॉल रेकॉर्डिंग फीचर वापरून कॉल कसे रेकॉर्ड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील

स्टेप 1 : Android 9 आणि त्यावरील आवृत्तीवर चालवणाऱ्या डिव्हाइससाठी हे फीचर वापरण्यासाठी सेटिंग्ज > अॅक्सेसिबिलिटी वर जाऊन Truecaller कॉल रेकॉर्डिंग अॅक्सेसिबिलिटी. काही डिव्हाईससाठी या सेटिंग - सेटिंग्ज - > अॅक्सेसिबिलिटी- > डाउनलोड केलेले अॅप्स मध्ये सापडेल.

स्टेप 2 : जेव्हा तुम्हाला कॉल येतो तेव्हा त्याचा ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी किंवा नवीन कॉल करता तेव्हा कॉलर आयडी स्क्रीनवरील रेकॉर्ड बटणावर टॅप करा.

loading image
go to top