आधार कार्ड मदतीने घरबसल्या करा ऑनलाईन KYC; जाणून घ्या पध्दत | Online KYC Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online KYC Update

आधार कार्ड मदतीने घरबसल्या करा ऑनलाईन KYC; जाणून घ्या पध्दत

Online KYC Update : बँका आणि इतर वित्तीय संस्थांसाठी KYC करणे गरजे आहे , KYC चा अर्थ 'Know Your Customer' असा होतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे KYC अनिवार्य केल्यानंतर, वित्तीय संस्थाला कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांचा पत्ता आणि ओळख व्हेरिफाय करणे अनिवार्य झाले आहे.

बँकांव्यतिरिक्त, सर्व गुंतवणूक किंवा बचत योजनांसाठी देखील केवायसी आवश्यक आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल किंवा फिक्स डिपॉझिट किंवा बँक खाते उघडायचे असेल, केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पेटीएम वापरत असाल तर तुम्हाला फक्त केवायसी प्रक्रियेतून जावे लागेल. पेटीएम व्यतिरिक्त, इतर सर्व मोबाईल वॉलेटसाठी देखील केवायसी करणे आवश्यक आहे. पण यासाठी केवायसी मोबाइलद्वारेच करता येईल.

सुरुवातीला, सर्व बँकांना डिसेंबर 2005 पर्यंत ग्राहकांचे केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. यानंतर दर दोन वर्षांनी केवायसी करावे लागेल. केवायसीसाठी, तुम्हाला बँकेत जाऊन तुमचे ओळखपत्र आणि पत्ता पुरावा सादर करावा लागेल. मात्र आता ते घरबसल्या ऑनलाइनही करता येणार आहे.

हेही वाचा: 2021 मध्ये बंद झाल्या या लोकप्रिय कार; जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑनलाइन केवायसी कशी करावी

आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ऑनलाइन केवायसी घरबसल्याही करता येते. जर तुम्हाला तुमच्या घरातूनच बँक खात्याचे KYC करायचे असेल, तर त्यासाठी तुमचे आधार कार्ड आवश्यक असेल. लक्षात ठेवा तुमचा आधार क्रमांक तुमच्या मोबाईल क्रमांकाशी जोडला गेला पाहिजे, तरच ऑनलाइन केवायसी करता येईल. कारण केवायसी करताना तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.

तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाइटवर जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Nidhi) साठी KYC करायचे असल्यास तुम्हाला pmkisan.gov.in वर जावे लागेल. यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तुम्ही OTP टाकून KYC साठी अर्ज करू शकता.

हेही वाचा: सैन्यात नोकरी म्हणून बापाकडून गावजेवण; मुलाचा वडिल अन् पत्नीलाही गंडा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
loading image
go to top