iPhone वापरकर्ते Gmail वर कॉन्टॅक्टशी करु शकतील चॅट, जाणून घ्या प्रोसेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iphone

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन कंपनी गुगल ही त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच काहीतरी घेऊन येत असेत. सध्या गुगल त्यांच्या सर्व वापरकर्त्यांसाठी त्यांचे जीमेल अ‍ॅप हे वन स्टॉप शॉप बनवण्यावर काम करत आहे.

iPhone वापरकर्ते Gmail वर कॉन्टॅक्टशी करु शकतील चॅट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन कंपनी गुगल (Google) ही त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच काहीतरी घेऊन येत असेत. सध्या गुगल त्यांच्या सर्व वापरकर्त्यांसाठी त्यांचे जीमेल अ‍ॅप (Gmail App) हे वन स्टॉप शॉप बनवण्यावर काम करत आहे.यामध्ये Google Meet इंटेग्रेशन अधीच जोडले गेले आहे आणि आता चॅट फीचचर देखील देण्यात येत आहे. आज आपण Google चा हा चॅट पर्याय कसा काम करतो हे जाणून घेणार आहोत. (know how to use gmail chat feature announced for iphone)

आता Gmail वापरकर्त्यांना हँगआउट वापरण्याची आवश्यकता नाही. लवकरच एक अ‍ॅप गुगल लॉन्च करत आहे ज्यामध्ये तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट्शी थेट चॅट करु शकाल. गुगलने चॅट इंटिग्रेशन रिलीज केले आहे. सध्या हे फीचर फक्त iOS साठी दिले आहे. याद्वारे आपल्या कॉन्टॅक्ट्शी संपर्क साधणे खूप सोपे झाले आहे. आपण आयफोनमधील जीमेलवर आपल्या कॉन्टॅक्ट्शी चॅट कसे करायचे असा विचार करीत असल्यास येथे आम्ही आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देत ​​आहोत.

आयफोनमध्ये Gmail वर आपल्या कॉन्टॅक्ट्शी चॅट कसे करावे

  • सर्वप्रथम आपल्याला आयफोनची आवश्यकता आहे, ज्यामध्ये आपल्याला Gmail अॅपची लेटेस्ट वर्जन (6.0.210404) डाउनलोड करावे लागेल.

  • आयओएसमध्ये चॅट पर्याय मिळविण्यासाठी, आपल्याला साइड मेनूवर टॅप करावे लागेल.

  • सेटिंग्जसाठी खाली स्क्रोल करा आणि आपल्या खात्याच्या नावावर टॅप करा.

  • येथे आपल्याला चॅटचा पर्याय (अर्ली एक्सेस) दिसेल. मग टॉगल ऑन करा.

  • आता जीमेल अ‍ॅप तुम्हाला अ‍ॅप रीस्टार्ट करण्यास सांगेल, त्यानंतर तुम्हाला त्यासाठी परवानगी द्यावी लागेल.

  • यानंतर तुम्हाला Meet आणि जीमेलच्या बाजूला खालच्या पट्टीवर चॅट पर्याय दिसेल.

हेही वाचा: आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर

जर पर्याय उपलब्ध नसेल तर काय करावे:

  • आपल्याला अॅपमध्ये चॅट पर्याय (अर्ली एक्सेस) दिसत नसेल तर आपल्याला जीमेलच्या डेस्कटॉप वर्जनवर जावे लागेल.

  • येथे आपल्याला सेटिंग्ज निवडाव्या लागतील आणि नंतर चॅट पर्यायावर जावे लागेल

  • त्यानंतर गूगल चॅट ऑप्शन निवडायचा आहे.

  • सध्या या चॅटचा ऑप्शन फीचर फक्त आयफोनवर उपलब्ध आहे. आपण Android वापरकर्ता असल्यास, आपल्यला त्यासाठी वाट पाहावी लागेल. हे फीचर अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी केव्हा येईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

(know how to use gmail chat feature announced for iphone)

हेही वाचा: Google Maps पुढील काळात आणणार 'हे; महत्वाचे फीचर्स; जाणून घ्या

loading image
go to top