फोनमध्ये इंटरनेटशिवाय वापरू शकता Google Maps, जाणून घ्या सविस्तर

टीम ईसकाळ
Tuesday, 23 February 2021

इंटरनेट बंद होतं आणि तुम्ही Google Maps वापरु शकत नाहीत. तेव्हा अशा परिस्थीतात तुम्हाला तुमचे डेस्टिनेशन शोधण्यात अडचण येऊ शकते. पण तुम्हाला ठाऊक आहे का की, इंटरनेट बंद असेल तरी देखील तुम्ही गुगल मॅप्स वापरु शकता. वाचा सविस्तर...

नाशिक : आपल्यापैकी प्रत्येकच जण रस्ते शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतो. सोबतच जेव्हा आपण नव्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा गुगल मॅपमुळे रस्ते विसरण्याचा धोका उरत नाही.  तुम्हाला रस्ता माहित नसला तरी अशा वेळी गुगल मॅप्सच्या मदतीने तुम्ही आरामात  त्या ठिकाणापर्यंत पोहचू शकता.

कधी कधी परिस्थिती अशी असते की, तु्म्ही  ग्रामीण भागात किंवा डोंगराळ भागात प्रवास करत असता आणि त्यावेळी नेमके नेटवर्क नसल्यामुळे इंटरनेट बंद होतं आणि तुम्ही Google Maps वापरु शकत नाहीत. तेव्हा अशा परिस्थीतात तुम्हाला तुमचे डेस्टिनेशन शोधण्यात अडचण येऊ शकते. पण तुम्हाला ठाऊक आहे का की, इंटरनेट बंद असेल तरी देखील तुम्ही गुगल मॅप्स वापरु शकता. तर आज आपण गुगल मॅप्स हे एप्लिकेशन सेल्युलर नेटवर्क नसताना देखील कसे वापरता येतील या बद्दल जाणून घेणार आहोत. 

सहलीली जाण्याआगोदर तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात तेथे नेटवर्कची समस्या आहे का? हे माहिती करुन घ्या. समजा तुम्ही जाताय त्या ठिकाणी नेटवर्क व्यवस्थित नसेल तर तुम्ही  Google Maps मधील 'ऑफलाइन मॅप्स' हे फिचर तुमची मदत करेल. या फिचरच्या मदतीने इंटरनेट  किंवा सेल्युलर नेटवर्क नसतानाही, ऑफलाइन नकाशे सहज वापरता येऊ शकतात. आता तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की हे फिचर नेमके कसे वापरतात? तर यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या जागेचा नकाशा तुम्ही तिथे पोहचण्याच्या आधीच डाऊनलोड करा आणि ते करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

1 .प्रथम मोबाईलमध्ये गुगल मॅप्स हे अॅप उघडा.

2. यानंतर, तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा, तुन्हाला तो उजवीकडे वरच्या बाजूस दिसतो.

3. तुम्ही प्रोफाइल फोटोवर क्लिक करताच अनेक पर्याय तुमच्यासमोर दिसतील. आपल्याला या पर्यायांमधून ऑफलाइन मॅप्स (Offline Maps) हा पर्याय निवडावा लागेल.

4.  ऑफलाइन मॅप्स या ऑप्शनवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला Select Your Own Map  हा पर्याय मिळेल, या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला बॉक्समधील लोकेशन नकाशा दिसेल. आपल्याला ज्या ठिकाणी भेट द्यायची आहे, त्या बॉक्सच्या आत ती जागा आणा आणि नंतर खाली दिलेल्या डाउनलोड पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे, आपण घरी ऑफलाइन मॅप डाउनलोड करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know how to use google maps offline in smartphones marathi article