तुमच्या जुन्या फोनला बनवा कारचे जीपीएस, जाणून घ्या सविस्तर

Android phones
Android phonesGoogle
Updated on
Summary

आपल्या जुन्या स्मार्टफोनचा घरातील इतर कामासाठी आपण कसा वापरू शकतो हे जाणून घेणार आहोत.

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनची दुनिया वेगाने बदलत आहे. प्रत्येक जण काही महिने एखादा नवीन फोन वापरतात आणि लगेच अपडेट होऊन बाजारात आलेला नवीन स्मार्टफोन विकत घेतात. पण जेव्हा आपण तो जुना फोन विकायला जातो तेव्हा त्या जुन्या स्मार्टफोनला (Smartphone) चांगली किंमतीही मिळत नाही. तो असाच कमी किमतीत विकावा लागतो. यावर उपाय म्हणुन, हा जुना स्मार्टफोन घरातील इतर कामासाठी आपण कसा वापरू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. (know some best uses for your old android smartphone)

जुन्या फोनचा काय उपयोग आहे?

तुम्ही या जुन्या स्मार्टफोनपासून तुमच्या कार, मोटरसायकलसाठी जीपीएस बनवू शकतात. या व्यतिरिक्त मुलेही याचा उपयोग त्यांच्या ऑनलाइन क्लाससाठी करू शकतात. तसेच हा जुना फोन घराच्या सुरक्षेसाठी वेबकॅम म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. मात्र याआधी फोनच्या कमकुवत आणि मजबूत भाग त्याचे बॅटरी बॅकअप आणि कॅमेर्‍याबद्दल माहिती घ्यावी लागेल.

Android phones
WhatsApp वापरकर्त्यांसाठी खुशखबर! आता लवकरच Android मधून iOS वर चॅट ट्रान्सफर शक्य

बनवा स्वत:चे जीपीएस

स्मार्टफोनमध्ये जीपीएसचे फीचर देण्यात आलेले असते, जेणेकरून आफम जेव्हा पाहिजे तेव्हा स्मार्टफोनचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. अशा परिस्थितीत आपण आपला जुना स्मार्टफोन कार किंवा बाईकचा ट्रॅकर म्हणून वापरू शकता. यामुळे तुमच् जीपीएस ट्रॅकर डिव्हाइसवर खर्च होणारे पैसे वाचू शकतात. Google Maps व्यतिरिक्त Google Playstore वर बरेच लोकेशन ट्रॅकर अॅप्स आहेत, जे जुन्या फोनवर इंस्टॉल करून नवीन फोन किंवा कंप्युटरवर लोकेशन पाहू शकता. यासाठी कार इलेक्ट्रीशियनच्या मदतीने कारच्या कोणत्याही भागामध्ये चार्जर बसवा आणि त्यानंतर फोन त्याच ठिकाणी सेट करा. आपण ही पद्धत बाइकमध्ये देखील वापरू शकता.

स्मार्टफोनला बनवा टीव्ही रिमोट

तुम्ही जुन्या स्मार्टफोनला टीव्ही रिमोट म्हणून देखील वापरू शकता. शाओमीचे सर्व फोन आयआर ब्लास्टरसह देण्यात आले आहेत, जे टीव्ही, एसी आणि इतर उपकरणे कंट्रोल करण्याची सुविधा देतात. याशिवाय आपल्याकडे घरात स्मार्ट टीव्ही असल्यास आपण कोणत्याही फोनला रिमोट बनवू शकता. अशा परिस्थितीत, जुना फोन कायमचा रिमोट बनविला जाऊ शकतो.

जुना फोन बनवा सीसीटीव्ही कॅमेरा

जुना स्मार्टफोन होम सीसीटीव्ही कॅमेर्‍यासारखा वापरला जाऊ शकतो, यासाठी आपल्याला गुगल प्लेस्टोअर वरून अल्फ्रेड कॅमेरा अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर त्याचा थेट लाइव्ह स्ट्रिमींग फोनमध्ये पाहाता येते. यासाठी स्वतंत्र वाय-फाय कनेक्शन घेण्याची आवश्यकता नाही, परंतु फोनमध्ये सिम टाकून व्हिडिओ स्ट्रीम केला जाऊ शकतो.

Android phones
Google Maps पुढील काळात आणणार 'हे; महत्वाचे फीचर्स; जाणून घ्या

गरीब मुलांना मदत करू शकता

कोरोनाच्या काळात बर्‍याच मुलांचे वर्ग ऑनलाइन होत आहेत, परंतु अजूनही बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांना स्मार्टफोन विकत घेणे परवडत नाही. अशा परिस्थितीत, आपण अशा मुलांना मदत करण्यासाठी आपला जुना स्मार्टफोन देऊ शकता जेणेकरून ते ऑनलाइन वर्ग घेऊ शकतात. मात्र फोन देण्यापूर्वी आपला सर्व डेटा ट्रांसफर करा आणि नंतर फोन फॉरमॅट करा.

(know some best uses for your old android smartphone)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com