
नागपूर : देशातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर स्पॅम कॉल थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हे सर्व प्रयत्न करूनही टेलिकॉमचे ग्राहक या स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहेत. कधीकधी हे स्पॅम कॉल्स वापरकर्त्यांना खूप अस्वस्थ करतात. परंतु बरेचदा आपल्याला गेम खेळत असताना, ओटीटीवर चित्रपट पाहताना किंवा आपल्या बॉसबरोबर भेटताना आणि मित्रांसह बाहेर जाताना फोन कॉल नको असतात. आपण सामान्य व्हॉईस कॉलमुळे देखील विचलित होतो. आज आम्ही आपल्याला ज्या मार्गाने आपण फ्लाइट मोडशिवाय फोनवर येणारे कॉल थांबवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
Incoming कॉल्स बंद करण्याची पद्धत
सुरुवातीला आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंग्स ओपन करा.
यानंतर Call Forwarding ऑप्शन वर क्लिक करा
यानंतर आपल्याला तीन ऑप्शन दिसतील - Always Forward, Forward When busy Forward when unanswered.
Always Forward या ऑप्शनवर क्लिक करा आणि असा नंबर एंटर करा जो बंद आहे किंवा काम करत नाहीये.
यानंतर Enable वर टॅप करा. यानंतर तुम्हाला येणारे सर्व कॉल्स थांबून जातील.
Incoming कॉल्स बंद करण्याच्या आणखी काही पद्धती
सुरुवातीला आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंग्स ओपन करा.
Sound वर क्लिक करा.
Do Not Disturb सिलेक्ट करा.
यानंतर Calls वर क्लिक करा.
यानंतर पॉप अप मेनूमध्ये जाऊन Do not Allow Any Calls ला सिलेक्ट करा.
आता allow repeat Callers च्या टॉगल ऑफ करा.
तुम्ही Call Barring पद्धतीचा वापर करू शकता.
यासाठी phone अप्लिकेशन ओपन करा आणि तीन डॉटवर क्लिक करा.
यानंतर Settings मध्ये जाऊन calls वर टॅप करा.
कॉल मेन्यू मध्ये Call Barring ऑप्शन वर क्लिक करा.
आता all Incoming calls ऑप्शनवर टॅप करा आणि call Barring पासवर्ड एंटर करा.
साधारणतः हा पासवर्ड 0000 या 1234 असतो.आता Turn On वर टॅप करा.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.