'बॅटलग्राउंड मोबाइल इंडीया' गेमची प्री-रजिस्ट्रेशनची तारीख घोषित, जाणून घ्या

टेक कंपनी Kraftonने काही काळापूर्वी भारतात Battlegrounds Mobile India लॉन्च करण्याची घोषणा केली होती.
Battlegrounds Mobile India
Battlegrounds Mobile India Google

टेक कंपनी Kraftonने काही काळापूर्वी भारतात Battlegrounds Mobile India लॉन्च करण्याची घोषणा केली होती. आता कंपनीने या गेमची प्री रजिस्ट्रेशन तारीख जाहीर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार Battlegrounds Mobile India गेमची पूर्व नोंदणी 18 मेपासून गुगल प्ले स्टोअरवर सुरू होईल. मात्र हा गेम कधी लॉन्च करण्यात येईल याची अद्याप घोषणा झाली नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेमच्या नोंदणीसाठी वापरकर्त्यांना बक्षीस मिळेल. हा बक्षिसे गेम सुरू होण्याच्या वेळी देण्यात येतील. (Know the battlegrounds mobile india game pre registration date)

Sanhok नकाशा देण्यात येणार?

कंपनीने नुकताच एक टीझर जारी केला, जो सॅनहोक नकाशाचा भाग असलेल्या बन ताई हे ठिकाण पाहू शकातै. यामुळे या गेममध्ये सॅनहोक नकाशा मिळेल हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय टीझरकडून अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Battlegrounds Mobile India
7 स्पोर्ट्स मोडसह Redmi Watch भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

कधी होईल लॉन्चिंग

kraftonने अद्याप बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाची लाँचिंग तारीख जाहीर केली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार या गेमचा ट्रेलर 31 मे 2021 रोजी रिलीज होईल. त्याचबरोबर हा गेम जूनपासून वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

प्रायव्हसी आणि डेटा आहेत प्रथम प्राधान्य

कंपनीने म्हटले आहे की वापरकर्त्यांची गोपनीयता आणि डेटा सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. आम्ही डेटा संरक्षित करण्यासाठी इतर कंपन्यांसह काम करीत आहोत. कंपनीने पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या नियमानुसार या गेमचे डेटा सेंटर भारतात तयार केले जाईल.

भारत सरकारने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पब्जीसह 118 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की 118 मोबाइल अॅप्स भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी, भारताचे संरक्षण, राज्य सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. भारतीय वापरकर्त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली होती.

(Know the battlegrounds mobile india game pre registration date)

Battlegrounds Mobile India
अमर्यादित डेटा हवाय? बीएसएनएलच्या योजनांबद्दल जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com