अमर्यादित डेटा हवाय? बीएसएनएलच्या योजनांबद्दल जाणून घ्या

बीएसएनएलची 99 रुपयांची योजना देखील बाजारात आहे. यामध्ये ग्राहकांना २२ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग मिळत आहे.
bsnl
bsnlsystem

सातारा : भारत संचार निगम लिमिडेटने (BSNL) ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन बाजारात आणले आहेत. यामध्ये 98 रुपये, 97 रुपये तसेच 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अधिकाधिक इंटरनेट डाटा (Interner Data) मिळत आहे. (unbelievable get unlimited data with bsnl rs 98 prepaid plan satara news)

देशात कोविड -19 या साथीच्या आजारामुळे घरून काम करणारे कर्मचारी, ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची माेठी संख्या असल्याने इंटरनेटची मागणी माेठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या वाढत्या मागणीमुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांनी अधिकाधिक ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. वेगवेगळ्या याेजनांच्या माध्यमातून ते ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये बीएसएनएलने देखील आघाडी घेतली आहे.

बीएसएनएलने 98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनचे वैशिष्टय म्हणजे ग्राहकांना दररोज दाेन जीबी डेटा देत आहे. हा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग हा 40 केबीपीएस असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

तथापि कंपनीने 97 रुपयांमध्ये आणखी एक योजना आणली आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज दाेन जीबी डेटा मिळताे. या योजनेत, डेटा वापरानंतर 80 केबीपीएस इंटरनेटची गती मिळते. याबराेबरच अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त या योजनेत तुम्हाला १०० एसएमएस देखील प्राप्त होतात असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

बीएसएनएलची 99 रुपयांची योजना देखील बाजारात आहे. यामध्ये ग्राहकांना २२ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग मिळत आहे.

bsnl
पीपीई किटचे बील 50 हजार रुपये; ऑडिट यंत्रणा ठरतेय कुचकामी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com