esakal | कसं झालं Bluetooth चं नामकरण? यामागची रंजक कथा ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
sakal

बोलून बातमी शोधा

कसं झालं Bluetooth चं नामकरण? यामागची रंजक कथा ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

कसं झालं Bluetooth चं नामकरण? यामागची रंजक कथा ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस (Electronic Devices) ब्लूटूथच्या (Bluetooth) मदतीने वायरलेसपणे एकमेकांशी कनेक्ट केले जाऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर दोन डिव्हाइस कनेक्ट करण्याचे ब्लूटूथ (Bluetooth Devices) कार्य करते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की हे डिव्हाइस कनेक्ट करणार्‍या तंत्रज्ञानाचे नाव 'Bluetooth' का आहे? जर माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला ब्ल्यूटूथच्या नावामागील एक मजेशीर कथा सांगणार आहोत. (Know the secret story behind the Name of Bluetooth)

हेही वाचा: Audio App Clubhouse नं लाँच केलं नवीन payment फिचर; असं करा easy payment 

ब्लूटूथला किंग ऑफ डेन्मार्कचे नाव

ब्ल्यूटूथच्या नावामागील कथा तंत्रज्ञानाशी नाही तर राजकारणाशी संबंधित आहे. ब्लूटूथचे नाव जिम कारडाच यांनी ठेवले होते, ते ब्ल्यूटूथ मॅन्युफॅक्चरिंग टीममध्ये होते. जिम कार्डाचनुसार त्यांनी 10 व्या शतकातील डेन्मार्कचा किंग हाराल्ड ब्लूटूथ म्हणून ब्लूटूथचे नाव घेतले आहे. किंग हाराल्ड अनेक राज्यांना जोडण्यासाठी परिचित होते. त्यांनी डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन यांचे एका राज्यात स्कॅन्डिनेव्हियामध्ये विलीनीकरण केले. सरदार पटेल यांनी अशीच काही कामे भारतात केली.

हेही वाचा: आता तुमच्या भाषेत पाठवा मेसेज; Koo app नं लाँच केलं 'Talk to Type' फिचर

जसे ब्लूटूथ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कनेक्ट करण्याचे कार्य करते त्याचप्रमाणे किंग हाराल्ड ब्लूटूथने राज्ये कनेक्ट केली. यामुळे जिम कर्डचने त्यास ब्लूटूथ असे नाव दिले. मात्र काही लोक म्हणतात की किंग हाराल्डच्या नावामागील ब्लूटूथ जोडण्यामागे एक विशेष कारण होते, कारण किंग हाराल्डचा एक दात पूर्णपणे मृत होता, ज्यामुळे तो निळा दिसत होता. यामुळे किंग हाराल्डच्या नावामागे ब्लूटूथची भर पडली.

(Know the secret story behind the Name of Bluetooth)