जाणून घ्या Google Tasks Mate; घरबसल्या एक्स्ट्रा कमाईसाठी गुगलचा नवीन फंडा 

goggle task mate
goggle task mate

जर आपल्याला आपल्या कामातून एक्स्ट्रा वेळ मिळत असेल आणि आपल्याला जर एक्स्ट्रा कमाई करायची असेल तर ही खुशखबर तुमच्यासाठीच आहे. घरबसल्या फार काही विशेष श्रम न करता तुम्ही ही कमाई करु शकता. जाता जाता काही टास्क पूर्ण करुन आपण पैसे कमावू शकता. विशेष म्हणजे ज्यादा कमाईची ही सुवर्णसंधी आपल्याला गुगल देत आहे. गुगल भारतामध्ये Google Tasks Mate ऍपची टेस्टींग करत आहे. या ऍपद्वारे आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे काही साधारण टास्क पूर्ण करुन पैसे कमावू शकता. आपल्याला एखाद्या दुकानाचे फोटो क्लिक करणे आणि सर्व्हेच्या प्रश्नांची उत्तरे देणे टास्कच्या स्वरुपात करावे लागेल. आणि यातील सर्वांत आनंदाची बाब म्हणजे या ऍपच्या गेममध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. 

कसे खेळायचा हा गेम?
गुगल ऍप टास्क मेटच्या टास्क सेटींग अथवा फिल्डसारख्या कॅटेगरीमध्ये असतील. पहिल्या कॅटेगरीत म्हणजेच सीटींग टास्कमध्ये आपल्याला स्थानिक भाषेत अनुवाद करण्याचे अथवा एखाद्या वाक्याला बोलून रेकॉर्ड करण्यासारखे काही टास्क मिळतील. तर फिल्डवरच्या टास्कमध्ये आपल्याल दुकानाची समोरुन फोटो घेणे अथवा मॅपिंगसंदर्भातील टास्क मिळतील. 

टास्कपूर्ती नंतर पैसेही मिळणार

ऍपमध्ये अनेक लेव्हल असतील. सोबतच आपल्याला या गोष्टीची माहिती मिळेल की आपण किती टास्क पूर्ण केले आहेत आणि आपला परफॉर्मन्स कसा राहिलाय. याशिवाय आपल्याला हेही माहित पडेल की आपण किती पैसे कमावले आहेत. आपण कोणत्याही वेळी, कोणत्याही जागी आपल्या सोयीनुसार हे टास्क पूर्ण करु शकता. टास्क जिंकल्यानंतर जे  पैसे मिळतील त्या पैशांना आपण कोणत्याही ई-वॉलेट अथाव बँक अकाऊंटमध्ये घेऊ शकता. सध्यातर गूगल टास्क मेट फक्त इन्व्हाईटच्या द्वारे मिळत आहे. म्हणजे आपण हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड तर करु शकता मात्र त्याला वापरू शकत नाही. हे ऍप सध्या बीटामध्ये आहे आणि रेफरल कोड सिस्टमद्वारे निवडलेल्या लोकांपुरताच मर्यादित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com