मनुष्याची जागा घेणार हे भन्नाट चॅटबॉट? सहज मिळेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर, पाहा काय आहे खास | ChatGPT AI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AI

ChatGPT AI: मनुष्याची जागा घेणार हे भन्नाट चॅटबॉट? सहज मिळेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर, वाचा काय आहे खास

Know about ChatGPT AI: गेल्याकाही वर्षात AI चा वापर वाढला आहे. या टेक्नोलॉजीने अनेकांना आवाक केले आहे. सध्या अशाच एका एआयवर आधारित चॅटबॉटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. डायलॉग बेस्ट एआय चॅटबॉटचे प्रोटोटाइप समोर आले आहे. या एआय आधारित चॅटबॉटचे नाव ChatGPT आहे. या चॅटबॉटचे वैशिष्ट्ये म्हणजे हे सहज मनुष्याची भाषा समजते. एवढेच नाही तर अगदी मनुष्याप्रमाणे हुबेहुब कोणताही लेख लिहिण्यास सक्षम आहे. टेक्स्ट जनरेटिंग AI मध्ये जनरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर अर्थात जीपीटी ही नवीन क्रांती समजली जात आहे.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

ChatGPT ची निर्मिती कोणी केली?

या चॅटबॉटमध्ये नवीन एआयला OpenAI फाउंडेशनने तयार केले आहे. ही एलॉन मस्क यांचीच एक रिसर्च संस्था आहे. मस्क यांनी स्टार्टअपला इतर गुंतवणुकदारांसह मिळून २०१५ साली सुरू केले होते. याचा उद्देश आधुनिक इंटेलिजेंसमध्ये बदल करत मानवाला उपयोगी येईल, असे बनवणे आहे. OpenAI हे इतर प्लॅटफॉर्मच्या डेटाबेसला ट्रेनिंगसाठी वापरत होते.

कसे काम करते ChatGPT ?

या एआयला इंटरनेटवरील माहितीच्या आधारावर ट्रेनिंग देण्यात आली आहे. या चॅटबॉटला तुम्ही कोणताही प्रश्न विचारल्यास सहज उत्तर मिळते. तसेच, एखादी माहिती हवी असल्यास चॅटबॉट सहज लेख लिहून देईल. अनेकांनी चॅटबॉटच्या वैशिष्ट्यांमुळे हे गुगलची जागा घेईल, असा अंदाज देखील वर्तवला आहे. विशेष म्हणजे चॅटबॉट कोड लिहू शकते, लेआउटची समस्या देखील दूर करण्यास सक्षम आहे. ग्राहकांच्या समस्यांना उत्तर देणे, रिकॉमेंडेशन देणे अशी अनेक कामे चॅटबॉट सहज करू शकते.

हेही वाचा: WhatsApp Scam: सावधान! WhatsApp वर आला नवा स्कॅम, नंबर डायल करताच तुमचे अकाउंट होईल हॅक

OpenAI चे CEO Sam Altman यांनी माहिती दिली की, ही फक्त सुरुवात आहे. पुढील काळात यात अनेक बदल पाहायला मिळतील व हे वेगवेगळी कामे सहज करू शकेल. याच्या क्षमतेबाबत अनेक शक्यता आहेत.

एआय घेणार मनुष्याची जागा?

कॉन्टेंट प्रोडक्शन अर्थात माहिती, लेख संदर्भातील कामांसाठी हे एआय खूपच उपयोगी आहे. हे प्रोग्रामरपासून ते शिक्षकांचे काम सहज करू शकेल. परंतु, सध्या या एआयची केवळ सुरुवात आहे. कंपनीनुसार, एआय चुकीची माहिती देखील देऊ शकते. त्यामुळे यासाठी ट्रेनिंग देणे देखील गरजेचे आहे.

टॅग्स :Technology