Dark web: हत्यारापासून ते ड्रग्सपर्यंत... इंटरनेटवरील 'या' जगात सर्वकाही कवडीमोल भावात मिळते

यूजर्सचा डेटा लीक झाल्यानंतर एक नाव नेहमी चर्चेत येते ते म्हणजे Dark Web. डार्क वेब नक्की काय आहे, त्याविषयी जाणून घ्या.
Dark Web
Dark WebSakal

Know What is the Dark Web: यूजर्सचा डेटा लीक झाल्यानंतर एक नाव नेहमी चर्चेत येते ते म्हणजे Dark Web. यूजर्सच्या खासगी डेटासह अनेक गोष्टींची डार्क वेबच्या माध्यमातून विक्री केली जाते. एवढेच नाही तर शस्त्रसाठ्यापासून ते ड्रग्सपर्यंत येथे तुम्हाला सर्वकाही मिळेल. मात्र, डार्क वेब नक्की काय आहे? हे अनेकांना माहिती नसते. डार्क वेब हे इंटरनेटचे असे जग आहे, जेथे प्रत्येकालाच एंट्री मिळत नाही. यासाठी खास ब्राउजरची गरज असते. या डार्क वेबविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे डार्क वेब?

आपण दररोजच्या कामासाठी ज्या वेबचा वापर करतो, तो इंटरनेटच्या जगातील खूप छोटासा भाग आहे. याला आपण ओपन वेब अथवा सरफेस वेब म्हणतो. तर डार्क वेबचा वापर सामान्य ब्राउजरद्वारे करता येत नाही. यासाठी स्पेशल ब्राउजरचा वापर केला जातो ज्याला TOR असे म्हटले जाते. एकप्रकारे, तुम्ही डार्क वेबला इंटरनेटवरील काळे जग म्हणू शकता.

जी माहिती तुम्हाला नियमित सर्च इंजिनवर मिळणार नाही. त्या सर्व माहितीचा अ‍ॅक्सेस डार्क वेबवर मिळेल. हॅकर्स कोणत्याही वेबसाइट अथवा प्लॅटफॉर्मवरून यूजर्सचा खासगी डेटा चोरी करतात व या डेटाची डार्क वेबवर विक्री करतात. येथे क्रेडिट कार्ड, गोपनीय कागदपत्रं आणि हँकिंग केलेल्या माहितीची विक्री केली जाते.

Dark Web
Upcoming Phones: नवीन फोन खरेदी करायचाय? काही दिवस थांबा, जानेवारीत एंट्री करणार 'हे' हटके डिव्हाइस

डेटाची किंमत किती?

रिपोर्टनुसार, डार्क वेबवरील ५००० पेक्षा अधिक क्रेडिट कार्डची माहिती सरासरी १२० रुपये किंमतीत मिळते. तर १००० क्रेडिट कार्ड्सच्या माहितीसाठी तुम्हाला ८० डॉलर खर्च करावे लागतील. २००० अकाउंट्सच्या बँक लॉग इन डिटेल्स फक्त ६५ डॉलर्स मिळतील. तर अमेरिकन एक्सप्रेसचा PIN डेटा अवघ्या २५ डॉलर्स मिळेल.

डार्क वेबवर Visa कार्डच्या पिनची किंमत २० डॉलर, १०० अकाउंट्सचे बँकिंग लॉग इन ३५ डॉलर्स, Cashapp च्या व्हेरिफाइड अकाउंट्सची माहिती फक्त ८०० डॉलर्समध्ये उपलब्ध आहे. अशाप्रकारेच, इतर माहिती देखील खूपच कमी किंमतीत डार्क वेबवर उपलब्ध आहे.

हेही वाचा: Safest Cars in India: भारतातील टॉप-5 सुरक्षित कार, अपघातानंतरही चालक-प्रवासी राहतील सेफ

डेटा खरेदी केल्यावर होते फसवणूक

अवघ्या कवडीमोल किंमतीत हा डेटा खरेदी केल्यानंतर हॅकर्स सर्वसामान्यांची फसवणूक करतात. अनेकदा सॅम्पल स्वरुपात देखील डेटा साइट्सवर उपलब्ध असतो. आर्थिक फसवणुकीसाठी या डेटाचा वापर केला जातो.

डार्क वेबवर मिळेल बरचं काही

डार्क वेबवर फक्त बँकिंग डिटेल्स अथवा खासगी माहितीच नाही तर इतरही वस्तू सहज मिळतात. येथे तुम्हाला बंदुक, बॉम्ब, ड्रग्सपासून जे विचार करू शकता, ते सर्वकाही मिळेल. दहशतवाद्यांकडून देखील याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com